लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई

सोशल मीडियावर लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंगची नजर आहे.

लातूरः जातीय तेढ निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ट्विटर हँडलरवर लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरकारची 16 यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई, पाकचे चॅनेल्स...

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट वाढत आहेत. सध्या सुरू असलेल्या विविध वादाचे अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी त्यांचे सोशल मॉनिटरिंग सेल अधिक कार्यान्वित केले आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग करीत असताना लातूर पोलिस ट्विटर हँडल वर एका ट्विटर युजरने कुठलातरी, आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण होईल असा व्हिडिओ लातूर पोलिसांना टॅग करून सेंड केल्याचे सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या पोलिसांच्या निदर्शनास आले.

लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...

सदर व्हिडिओमधील घटनेबाबत माहिती घेतली असता सदरची घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली नसल्याचे निष्पन्न झाले. सदर ट्विटर युजरने सामाजिक शांतता भंग करून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सदरची व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यावरून सोशल मीडिया मॉनिटर सेल मधील पोलिस अमलदार रियाज सौदागर यांचे फिर्याद वरून संबंधित ट्विटर युजरच्या विरुद्ध पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे दिनांक 25/04/2022 रोजी गुन्हा क्रमांक 202/2022 कलम 505(2) नुसार आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ट्विटर यूजरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कुदळे हे करीत आहेत.

लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

लातूर पोलिसाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश पसरू नयेत. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अथवा इतर सोशल मीडिया ग्रुपवर सामाजिक, धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे लिखाण, फोटोज, व्हिडिओज, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल सर्व प्रकारच्या मीडिया सोर्सवर लक्ष ठेवून आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱयाविरुद्ध यानंतरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

लातूरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांना टाकला छापा अन्...

कोणीही सोशल मीडियातून एखाद्याची बदनामी होईल असे मेसेज टाकू नये. धार्मिक तेढ तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशी व्यक्तिगत किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकू नये. सोशल मीडियावर लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंगची नजर असून आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक, व्हाट्सअप, टिकटॉक, इंस्टाग्राम व इतर कोणत्याही माध्यमातून केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर पोलिसांनी दिला आहे.

लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: latur crime news latur social media monetering sell police a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे