लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...
परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला.लातूर: परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून, 20 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे वाढवणा हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली.
पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...
सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना 22/05/2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस ठाणे वाढवणा हद्दीतील मौजे हळी येथील एका ज्यूस सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या तिरट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणेः
1) जावेद इसाक शेख वय 35 वर्ष धंदा मजुरी राहणार खडकगल्ली, हाळी तालुका उदगीर.
2) युनुस मुजम्मिल शेख, वय 35 वर्ष, धंदा मजुरी, राहणार आदर्श कॉलनी, हंडरगुळी तालुका उदगीर.
3) मनोहर नामदेव मसुरे, वय 38 वर्ष, धंदा मजुरी, राहणार बौद्ध नगर, हाळी तालुका उदगीर.
4) अहमदपाशा मैनोद्दीन शेख, वय 36, वर्ष धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.
5) खालील शरीफ शेख, वय 33 वर्ष, धंदा शेती, राहणार खडकपुरा, हाळी तालुका उदगीर.
6) महबूब मैनोदीन सय्यद, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर.
7)हमजा सत्तारसाब मोमीन, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.
8) अशोक दत्तराव धुपे, वय 47 वर्ष, धंदा शेती, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर.
9) जाकीर पाशासाहेब डांगे, वय 55 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.
10) संजय पंढरीनाथ दापके वय 55 वर्ष धंदा शेती राहणार मोरतळवाडी, तालुका उदगीर.
11) बालाजी रंगनाथ पेंढारकर, वय 52 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हळी तालुका उदगीर.
12)दामोदर नागोराव भांगे, वय 65 वर्ष, धंदा शेती, राहणार वाढवणा तालुका उदगीर.
13) जमीर रफिक शेख, वय 29 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.
14) बालाजी नामदेव भंडरपे, वय 45 वर्ष, राहणार गादेवाडी तालुका अहमदपूर.
15) जलील मिरासाब शेख, वय 32 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.
16) विक्रम विनोद शिंदे, वय 23 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हळी तालुका उदगीर.
17) शाहरुख शौकत चौधरी, वय 26 वर्ष, राहणार हंडरगुळी, तालुका उदगीर.
18) सोपान दिगंबर बंडेवाड, वय 47 वर्ष, कोळवाडी तालुका अहमदपूर.
19) नितीन विठ्ठलराव मुळे, वय 30 वर्ष, राहणार सुकणी तालुका उदगीर.
20) अनिल कमलाकरबाई कांबळे, वय 42 वर्ष, धंदा मजुरी, राहणार हाळी तालुका उदगीर.
यांच्यावर पोलिस ठाणे वाढवणा येथे कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 27 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस स्टेशन वाढवण्याचे पोलिस अंमलदार सारोळे हे करीत आहेत.
लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात त्यांच्या पथकातील पोलिस ठाणे वाढवणा येथील पोलिस अंमलदार हाके, कलमे, शेख, रायभोळे, गोमारे, पुट्टेवाड, मामाडगे, पाटील यांनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...
लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...