मोठी कारवाई! लातूर जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त...

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची कारवाई केली.

लातूरः 27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून, 11 जणां विरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची कारवाई केली.

पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर व अहमदपूर यांनी उपविभागीय चाकूर, अहमदपूर पोलिस ठाणे चाकूर आणि अहमदपूर तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील पोलिस अंमलदार अशा एकूण 25 पोलिस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून अहमदपूर पोलिस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. त्याप्रमाणे उपविभाग अहमदपूर हद्दीमधील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता अवैध धंद्याची माहिती काढत होते. 

पोलिस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर शहर व परिसरातील काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची चोरटी  विक्री व्यवसाय करीत आहेत साठवणूक करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 6 जणांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले  गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे.

'पोलिसकाका'कडून MPSC/UPSC विद्यार्थ्यांसह वाचकांसाठी पुस्तक नोंदणी...

सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. विठ्ठल लोंढे यांचे तक्रारीवरून पोलिस ठाणे अहमदपूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे नामे
1) परवेज इस्माईल शेख, वय 36 वर्ष, राहणार काळेगाव रोड , अहमदपूर
2) अयाज इस्माईल शेख, राहणार कमला नेहरू शाळेच्या बाजूला, अहमदपूर
3) गौस तांबोळी,राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर.
4) इब्राहिम तांबोळी,राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर.
5) निसार बीस्ता सर्व राहणार अंबाजोगाई रोड, अहमदपूर.
 6)बाळू मुंडे, राहणार भाग्यनगर अहमदपूर
 7)राजू हामने, राहणार भाग्यनगर अहमदपूर.
8) जावेद शेख,राहणार भाग्यनगर अहमदपूर. 
9) आसद तांबोळी, राहणार अहमदपूर 
10)सय्यद इब्राहिम, राहणार अहमदपूर
11) इसाक शेख , राहणार अहमदपूर यांचे विरुद्ध पोलिस ठाणे अहमदपूर येथे
1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 533/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59
2) गुन्हा रजिस्टर क्रमांक 534/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59.
3) गुन्हा रजिस्टर क्रमांक 535/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59.
4) गुन्हा रजिस्टर क्रमांक 536/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम-59.
याप्रमाणे 04 गुन्हे दाखल करून  27 लाख 80 हजार 485 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपी पैकी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर 5 आरोपी फरार आहेत.त्यांचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम,यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक दूरपडे, पोलिस उपनिरीक्षक रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय चाकूर,अहमदपूर तसेच पोलिस ठाणे चाकूर,अहमदपूर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील जवानांनी पार पाडली.

लातूर जिल्ह्यात तब्बर १२ वर्षानंतर मोक्कातंर्गत कारवाई; पाहा आरोपींची नावे...

लातूर पोलिसांची जुगार अड्यावर धाड; पाहा २० जणांची नावे...

लातूर पोलिसांनी पाठलाग करून पकडले अन् १३ मोटारसायकली जप्त...

लातूर पोलिसांनी वाहनाच्या पाठीमागे जाऊन पाहणी केली अन्...

उदगीर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची दुचाकी चोरांविरोधात कारवाई...

लातूरमध्ये जिल्हाध्यक्षासह एकाला गांजा आणि मुद्देमालासह अटक...

लातूर पोलिसांची फार्महाऊसवर धाड; लाखो रुपयांचे चंदन जप्त...

लातूरमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त; पाहा १० जणांची नावे...

लातूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; खुनाचा उलगडा केला अन्...

लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...

लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई

लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...

लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: latur crime news latur police seized gutka at ahmadpur area
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे