लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

गुंडाला महिला पोलिसाने भररस्त्यात फटके दिले आणि पोलिस स्टेशन गाठले. त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लातूर : लातूर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला पोलिसी खाक्या दाखवत त्याची पोलिस स्टेशनपर्यंत वरात काढली. यावेळी महिला पोलिसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. महिला पोलिसाच्या या फटक्यांमुळे इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.

बापरे! मुलीला त्रास देतो म्हणून मुलीच्या आईने घरात कोंडले अन्...

लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात मागील काही दिवसांपासून गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दशहत निर्माण करत होता. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 18 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 14 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीला त्याने मारहाण केली होती. त्या भागात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने विवेकानंद पोलिस ठाण्यात रितसर तक्रार केली. विवेकानंद पोलिस ठाण्याचे कर्मचारी आरोपीच्या शोधात होते. गौस मुस्तफा सय्यद हा दयानेश्वर नगर भागात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले. त्याला ताब्यात घेण्यात आले. परंतु, या गुंडाला तिथून पोलिसांच्या गाडीतून न नेता रस्त्यावरुन चालवत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी विवेकानंद पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याने या कारवाई पुढाकार घेतला होता.

मोबाईल जबरी चोरी करणाऱया आरोपींना युनिट ५ने केले जेरबंद

गौस मुस्तफा सय्यद याला पोलिसी खाक्या दाखवतच तो रस्त्यावर गयावया करु लागला. तो ज्या भागात दशहत निर्माण करत होता त्याच भागात त्याची ही अवस्था पोलिसांनी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुखावले होते. पोलिसांनी रस्त्यावरुन त्याची काढलेली वरात अनेकांनी पाहिली. दशहत निर्माण करणाऱ्या या गुंडाला महिला पोलिसाने भररस्त्यात फटके दिले आणि पोलिस स्टेशन गाठले. त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, अशाप्रकारे कोणी कृत्य करत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे.

पोलिसांकडून गुंगारा देणाऱया सराईत गुन्हेगारास अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: latur crime news lady police action on gangster and people t
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे