लातूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; खुनाचा उलगडा केला अन्...

अनोळखी मयताची तात्काळ ओळख पटवून चाकूर पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. आरोपीस गजाआड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूरः अनोळखी मयताची तात्काळ ओळख पटवून चाकूर पोलिसांनी खुनाचा उलगडा केला आहे. आरोपीस गजाआड केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, 25/04/2022 रोजी मौजे मोहनाळ येथील शेत गट नंबर 6 मधील बालाजी रामराव मुंडे यांचे शेतामध्ये एका अनोळखी पुरूष जातीच्या व्यक्तीच्या डोक्यात काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून अभयसिंह देशमुख, सहायक पोलिस अधिक्षक, प्रभारी अधिकारी, पोलिस ठाणे, चाकुर यांनी घटनास्थळी जावून मयताची पाहणी केली होती. मयताची ओळख पटवीने कामी दोन पथके तयार केली होती. मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असताना पथकास माहिती मिळाली की, सदरचा मयत हा अंकुश देवराव डावरे (वय 40 वर्षे, रा साठे नगर अहमदपुर जि लातूर) असा असल्याचे निष्पन्न झाली. भा द. वि. कलम 302 अन्वये अज्ञात मारेकऱ्याविरुध्द गुन्हा नोंद केला होता.

लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...

नमुद गुन्ह्याचा तपास अभयसिंह देशमुख, सहायक पोलिस अधिक्षक, प्रभारी अधिकारी, पोलिस ठाणे, चाकुर हे करत असतांना सदर मयत व्यक्तीस कोणी मारहाण करुन खुन केला याबाबत सर्व शक्यता तपासून पाहून मयताचे सर्व बाबींनी तपास केला. परंतु, गुन्हा उघडकीस येईल अशी कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने निखील पिंगळे, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक, निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग चाकुर यांचे मार्गदर्शनाखाली मयत वापरत असलेले वस्तू व इतर तांत्रीक गोष्टींचा तपास केला. आरोपीचा शोध घेणे बाबत सुचनांप्रमाणे तपासी अधिकारी अभयसिंह देशमुख, सहायक पोलिस अधिक्षक यांनी त्यांचे स्टाफचे मदतीने तांत्रीक तपास करुन गुन्ह्यातील आरेापी निष्पन्न करुन आरोपी सुनिल विठ्ठल भोसले (वय 25 वर्षे, रा. हरंगुळ खुर्द ता जि लातुर, सध्या करमाळा तालुका आणि पुणे) याने सदरचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यास पुणे येथून सदर पथकाने शिताफीने गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले. पोलिस स्टेशन येथे आणून गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात तांत्रीक तपासकामी सायबर सेल लातूर येथील सपोनि गायकवाड व स्टाफने वेळोवेळी तांत्रीक मदत करुन गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

सदरचा खून आरोपीने मयताचे अंगावरील त्याचे मुलीचे लग्नासाठी घातलेले नवीन व चांगले कपडे पाहून त्याचे जवळ चांगला मोबाईल व पैसे असतील म्हणून त्यास चाकुर जुने बसस्थानकाजवळून घरणी येथे सोडतो असे म्हणून लिफ्ट देवून त्यास मोहनाळ शिवारात टमाट्याचे काढलेले पिकात नेले. त्याचा खुन केला. सदर गुन्ह्याचा तपास निखील पिंगळे, पोलिस अधीक्षक सअनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक साहेब, निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी उप विभाग चाकुर यांचे मार्गदर्शनाखाली अभयसिंह देशमुख, सहायक पोलिस अधिक्षक, प्रभारी अधिकारी, पोलिस ठाणे, चाकुर पोउपनि  तुकाराम फड, पोउपनि कपिल पाटील, पोलिस अमलदार हनुमंत आरदवाड, सुनिल घोडके, सुग्रीव मुंडे, सुकेश केंद्रे, हनुमंत म्हस्के,पाराजी पुठ्ठेवाड, महेश चव्हाण यांचे पथकाने केला आहे.

लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई

लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...

लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: latur crime news chakur police trace murder case and arreste
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे