कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी सुरु

शिक्रापूर पोलिसांचे हद्दीतील ग्रामपंचायतींना पत्र...

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या वतीने परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र देण्यात येत आहे.

पुणे: एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराला चार वर्ष पूर्ण होत आहे. एक जानेवारी रोजी होणारा शौर्यदिन रोजी होणारा विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी परिसरातील सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी शांतता टिकविण्यासाठी पुढाकार घेत मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे तयारी सुरु केलेली असून, परिसरातील ग्रामपंचायतींना शिक्रापूर पोलिसांकडून पत्र देण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवाद्यांना अटक अन्...

कोरेगाव भीमा, पेरणे येथे एक जानेवारी या शौर्यदिनी विजय रणस्तंभाला अभिवादन करत मानवंदना करण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी परिसरातील कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद, सणसवाडी, शिक्रापूर, वढू बुद्रुक या ग्रामपंचायती पुढाकार घेत असतात. दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतच्या वतीने सर्व समाजबांधवांना पिण्याचे शुद्ध पाणी, नाष्टा, जेवण, पार्किंग, फिरते शौचालय या सुविधा सर्व समाज बांधवांना देत समाजबांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत असते. जिल्हा प्रशासन या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करत असते. मागील वर्षी कोरोना मुळे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावर्षी कोरोनाचे सावट संपत असताना मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होण्याची शक्यता असताना आता पोलिसांनी सदर कार्यक्रमासाठी तयारी सुरु केलेली आहे.

बापरे! विम्यासाठी 1000 खताच्या पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली लपवली कार...

सध्या शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या वतीने परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र देण्यात येत असून, त्याद्वारे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, हद्दीतील अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स काढून टाकावे, फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी बंधनकारक करावी, एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावामध्ये आक्षेपार्ह फ्लेक्स लागणार नाही याची काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी कार्यालय कडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, गावातील परिसर स्वच्छ ठेवावा, गावातील पथदिवे सुरु ठेवावे, ग्रामपंचायतचे कर्मचारी कोणत्याही वेळी उपस्थित राहतील असे नियोजन करावे अशा सूचना पोलिसांच्या वतीने सदर ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.  नागरिकांनी सोशल मिडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील अनेक ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ हे प्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

भीम बांधवांमध्ये वाढ होणार...
विजय रणस्तंभ मानवंदना कार्यक्रम मागील वर्षी कोरोनामुळे मर्यादित प्रमाणात झालेला होता मात्र आता यावर्षी कोरोनाचे सावट दूर झालेले असून या वर्षी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित राहू शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते असे असे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: koregaon bhima news shikrapur police letter to grampanchyat
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे