कोल्हापूरमधील प्रेमी युगलाने बीडमध्ये उचलले धक्कादायक पाऊल...

घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

बीड : कोल्हापूर येथून काही महिन्यांपूर्वी उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी मृतांची नावे आहेत. प्रथम प्रेयसीने आणि त्यांनतर प्रियकराने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेम! विवाहानंतर 17 दिवसांतच नवरदेवाने घेतला मोठा निर्णय...

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे हा त्याच्या आई-वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत असे. घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तीन महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री उत्रेश्वर पिंपरी येथे आले होते.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर गंभीर आरोप

आकाश मंगळवारी घराबाहेर गेल्यानंतर सावित्रीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. त्याने सावित्रीचा गळफास सोडून तिला खाली घेतले. शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगितले. सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली.

धक्कादायक! नवरीचा प्रियकर आणि नवरदेव एकमेकांना भेटले अन्...

दरम्यान, हा प्रकार बुधवारी (ता. 21) सकाळी उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम काळे आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! मी, त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो...

धक्कादायक! प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही...

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: kolhapur lover couple suicide by hanging self in beed police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे