'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...

नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर 'गुडबाय' असा मेसेज शेअर करून आणि स्टेट्स मेसेज ठेवल्यानंतर युवकाने धक्कादायक निर्णय घेतला.

कोल्हापूर: नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर 'गुडबाय' असा मेसेज शेअर करून आणि स्टेट्स मेसेज ठेवल्यानंतर युवकाने धक्कादायक निर्णय घेतला. लिंगनूर (ता. कागल) मधील युवकाने त्याच्या नात्यातील खोतवाडी (इचलकरंजी) मधील युवतीचा गिरोली घाटात (ता.  पन्हाळा) खून करून स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१) असे मृत युवतीचे नाव आहे. संशयित युवक कैलास आनंदा पाटील (वय २८) याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि कैलास हे नात्यातील असल्याने एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. लग्नाला काही नातेवाईकांचा विरोध होता. कैलास याने ऋतुजा हिला मंगळवारी भेटण्यास बोलविले. तिला चारचाकीतून घेवून तो गिरोली घाटात गेला. त्याठिकाणी त्याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर 'गुडबाय' असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो मेसेज वाचून युवतीच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिस मोबाईलचे लोकेशन तपासून गिरोली घाटाकडे रवाना झाले. पेठवडगाव आणि कोडोली पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरू होता. कैलास याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कैलास याच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. तो फरशी बसविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल पुरवण्याचे काम करतो. ऋतुजा ही बी. एस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती.

दरम्यान, कैलास याने मित्रांना मी जीवन संपवणार आहे. माझा गावात मोठा फोटो लावा असे सांगितले होते. मोबाईलवर त्याने 'मला माफ करा. मी जात आहे. गुडबाय लाईफ' स्टेटसही ठेवला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: kolhapur crime news youth murder girl friend and try to suci
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे