कोल्हापूरमध्ये गुन्हेगार बापाचे स्वतःच्या मुलीसोबत गैरकृत्य; पत्नीवरही गोळीबार...

पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूर: इचलकरंजी शहराजवळ असलेल्या शहापूर येथे गुन्हेगार बापाने स्वतःच्या मुलीशी गैरकृत्य केल्याची वाच्यता करू नये यासाठी पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

याबाबतची फिर्याद संशयिताच्या पत्नीने दिली आहे. कुख्यात गुन्हेगारावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयिताला अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

संबंधित गुन्हेगार एप्रिल 2022 मध्ये ‘मोका’च्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे. ऑक्टोबर 2022 पासून संशयिताची मुलगी घरामध्ये एकटी असताना तिच्याशी गैरकृत्य करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान ती तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तिने त्याला बाजूला ढकलत ती घराच्या खाली पार्किंग विंगमध्ये पळून गेली. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी मुलीने ही घटना आईला सांगितली. तिने याबाबतचा जाब विचारून वागण्यात सुधारणा नाही केली तर घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगून पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले.

यावर संशयिताने तक्रार करून तर बघ, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत घरातील बेडवर पाडून पत्नीचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलांनी बाजूला ढकलून आईला सोडवले होते. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी संशयिताने पत्नीच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडली. पत्नी बाजूला पळाल्याने गोळी बेडरूमच्या दरवाजाजवळील भिंतीमध्ये घुसली. यावेळी त्याने मुलांनाही ठार मारण्याची धमकी दिली. 21 डिसेंबर रोजी पुन्हा नातेवाईकांमध्ये बदनामी करतेस, असे म्हणत त्याने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाने संशयिताला बाजूला केले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अपार्टमेंटमध्येही तो नेहमी दारू पिऊन यऊन बंदुकीची भीती दाखवून दहशत निर्माण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूरमध्ये युवकाचा पाठलाग करुन सपासप केले २० वार अन्...

धक्कादायक! कोल्हापूरमध्ये पत्नी, मुलगा आणि मुलीची केली हत्या; कारण...

कोल्हापूरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; युवतींची सुटका...

बापरे! सांगलीत चिमुकल्याच्या बाबतीत घडला धक्कादायक प्रकार

हृदयद्रावक! एकमेकांना घट्ट मिठी मारलेली पाहून पोलिसही हळहळले...

धक्कादायक! अनैतिक संबंधातून पत्नी आणि प्रियकराने काय केले पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: kolhapur crime news firing directly at wife in ichalkaranji
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे