किरीट सोमय्या यांचा मोठा आरोप; हसन मुश्रीफ यांचा प्रत्यारोप...

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठे आरोप केले आहे. यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत प्रत्यारोप केले आहेत.

मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठे आरोप केले आहे. यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत प्रत्यारोप केले आहेत.

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

किरीट सोमय्या यांचे आरोप...
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी कोट्यवधींचे घोटाळे केले आहेत. 127 कोटींचे पुरावेही आपल्याकडे आहेत. मनी लाँडरिंग, बेनामी संपत्ती विकत घेण्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. 2018-19 मध्ये इन्कम टॅक्सकडून मुश्रीफ यांच्या घरावर धाडीही टाकण्यात आल्या होत्या. मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक...

हसन मुश्रीफ यांचे प्रत्यारोप...
हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या पक्षांच्या विरुद्ध आणि आमच्या नेत्यांविरुद्ध बिनबुडाचे खोटे आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले. माझ्या 17 वर्षांच्या कार्यकाळात एकही आरोप झाले नाहीत. माझ्या घरावर आणि कारखान्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळीही त्यांना काहीही सापडले नाही.

मनोहर मामा भोसले सातारा येथून पोलिसांच्या ताब्यात

सोमय्या यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर मुश्रीफ यांनी निशाणा साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरुनच सोमय्या यांनी आपल्यावर आरोप केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: kirit somaiya allegation on hasan mushrif 127 crore scam mon
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे