पोलिसांमुळे अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत...

मुलाची चोरी झाल्या प्रकरणी सुनिताने महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिलेच्याजवळ झोपलेल्या सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कसोशीने तपास करीत 48 तासात अपहरण प्रकरणातील पाच जणांना अटक केली आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय तपासाचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी विशेष कौतूक केले आहे.

मुलीच्या आईला रात्री जाग आल्यावर बसला धक्का अन्...

पश्चिमेकडील महमद अली चौक परिसरातील शिवमंदिराचे बाजूला एका दुकानाच्या बाहेर सुनिता राजकुमार नाथ ही महिला तिच्या सहा मुलांसह शनिवारी (ता. 5) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झोपली होती. त्यावेळी मध्यरात्री 1 च्या सुमारास दोन जण त्याठिकाणी आले आणि त्यांनी तिच्या जवळ झोपलेल्या सहा महिन्याच्या जिवा नावाच्या मुलाचे अपहरण केले. मुलाची चोरी झाल्या प्रकरणी सुनिताने महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी प्रकाश पाटील, दीपक सरोदे यांच्या पथकाने बाळाचा शोध सुरु केला. या प्रकरणी कुठलेही धागेदोरे नसताना पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचा आधार घेत तपास सुरु केला.

धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

प्रारंभी मुलाला उचलून नेणा-या आणि सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेल्या विशाल त्र्यंबके आणि कुणाल कोट या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुलाला पळवून कोट याची पत्नी आरती हिच्याकडे ठेवले होते. कुणाल हा त्याची पत्नी आरतीसोबत दिव्याला राहतो. विशाल हा कल्याण परिसरातील अटाळी भागात राहतो. चोरलेले बाळ भिवंडी येथील हिना माजीद आणि फरहान माजीद या दाम्पत्याला 1 लाख रूपयांना विकण्याच्या ते तयारीत होते. हिनाला दोन मुली आहेत. मात्र, तिला मुलगा होत नसल्याने तिने मुलगा विकत घेण्याचे ठरविले होते. पाचही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 14 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: kalyan police trace kidnapped child and gave her mother five
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे