युवतीने लैंगिक अत्याचाराला कंटाळून उचलले मोठे पाऊल अन्...

लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका युवतीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वमध्ये घडली आहे.

कल्याण : लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका युवतीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वमध्ये घडली आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

येरवडा कारागृहात गेल्यामुळे झाला हाकनाक त्रास अन् बदनामी पण...

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने सात तरुण संबंधित युवतीवर गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून तिने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी युवतीचा मोबाईल तपासल्यानंतर त्यामध्ये सुसाईड नोट आढळून आली. त्याच्या आधारे कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती. पोलिसांनी या आठही जणांना अटक केली आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. 

थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

पीडितेच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे. तिला ढकललं की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांनी करावा. तिला ब्लॅकमेल केले जात होते. बलात्काराची कलमे का लावली नाहीत? कल्याणमधील एका मोठ्या बिल्डरची मुले यात सहभागी आहेत, आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, बिल्डरकडून आमच्यावर देखील दबाव आणला जात आहे, आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला देखील पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

स्वारगेटजवळ मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार; दोन तासात अटक...

मुसेवाला हत्या प्रकरणी संतोष जाधववर पुणे पोलिसांची कारवाई...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: kalyan crime news girl suicide at kalyan 8 friend tourcher p
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे