काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईमुळे घाबरलेले दहशतवादी नागरिक, पोलिस आणि लष्कराच्या जवानांना लक्ष्य करत आहेत.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा श्रीनगरच्या बटमालू भागात घडली आहे. पोलिसाची हत्या केल्यानंतर दहशतवादी पळून गेले.

काश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा...

काश्मीरमधील बटमालू भागातील एसडी कॉलनीमध्ये दहशतवाद्यांनी पोलिस हवालदार तौसीफ (वय २९) यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिस आणि लष्कराकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या कारवाईमुळे घाबरलेले दहशतवादी नागरिक, पोलिस आणि लष्कराच्या जवानांना लक्ष्य करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सने या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले, श्रीनगरच्या बाटमालू येथे 29 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो. निंदा करायला शब्द पुरेसे ​​नाहीत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: jammu kashmir news policeman was shot dead by terrorists in
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे