काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवाद्यांना अटक अन्...

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पुलवामा पोलिस दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास करत असताना दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईत एका तासात 5 दहशतवादी ठार...

शौकत इस्लाम डार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी त्यांची नावे असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हे मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी तसेच वाहतुकीमध्ये गुंतले होते. अटक करण्यात आलेले दहशतवादी त्यांच्या पाकिस्तानी सल्लागाऱ्यांच्या सांगण्यावरून सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड हल्ल्यांमध्ये सहभाग होते. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी काकापोरा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; एकाचा खात्मा...

दरम्यान, कुलगाम जिल्ह्यात शनिवारी (ता. २०) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर ठार झाला आहे. दक्षिण काश्मीरच्या अशमुजी भागात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या...

काश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा...

अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: jammu and kashmir network exposed of lashkar e taiba 5 terro
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे