हृदयद्रावक! महिला पोलिसाच्या डोक्यात बैलाचे शिंग घुसल्याने दुर्देवी मृत्यू

मुलीच्या साखरपुड्याची तयारी करण्यासाठी गावाकडे जात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आईच्या डोक्यात बैलाचे शिंग घुसल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जालना: मुलीच्या साखरपुड्याची तयारी करण्यासाठी गावाकडे जात असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आईच्या डोक्यात बैलाचे शिंग घुसल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. सुनीता ईश्वरसिंग डोभाळ (वय ४५) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सुनिता डोभाळ (रा. इब्राहिमपूर तालुका भोकरदन) या जालना येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. रविवारी (ता. १५) सकाळी मुलगा रोहीत सोबत दुचाकीवरून जालना येथून इब्राहिमपूरला जात होत्या. सकाळी 11 वाजेच्या सुमारास राजूरजवळ दुचाकीची आठवडी बाजारात विक्रीसाठी जात असलेल्या बैलांची धडक झाली. यावेळी एकमेकांना बांधलेले पाच ते सहा बैल उधळले. यात एका बैलाचे शिंग डोक्यात घुसल्याने सुनीता डोभाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा रोहितला किरकोळ मार लागल्याने बचावला. या प्रकरणात राजूर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिता डोभाळ यांचे पती ईश्वरसिंग हे सुद्धा पोलिस खात्यात कर्मचारी होते. मात्र, 10 वर्षांपूर्वी  त्यांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागेवर पत्नी सुनिता यांना अनुकंपावर 2017 मध्ये नोकरी लागली होती. पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलगी प्रियंका व मुलगा रोहित यांचा सांभाळ केला. प्रियंकाचा विवाह निश्चित होऊन 24 जानेवारी रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी गावाकडील नातेवाईक यांना निमंत्रण देणे व कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी त्या मुलासोबत गावाकडे निघाल्या होत्या. मात्र, काळाने त्यांच्यावर मध्येच झडप घातली. त्यांच्या अपघाती निधनामुळे बहिण भावाच्या डोक्यावरील वडीलानंतर आईचे देखील छत्र हिरावले.

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या...

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या...

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसकाकाचा मृत्यू...

हृदयद्रावक! दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या महिला पोलिसाचा मृत्यू...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन...

हृदयद्रावक! महिला पोलिस मुलाला उपचारासाठी घेऊन जात असतानाच...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसकाका भास्कर मोढवे यांचे हृदयविकाराने निधन

पोलिसकाका सुनील जंगम यांच्या निधनाने बसला धक्का...

पुणे जिल्ह्यात पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप...

नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण समोर...

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमारतीवरून तोल गेल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: jalna police news women police sunita dhobal passes away acc
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे