जांबसमर्थ येथील राम मंदिरातील मुर्त्या चोरी करणारे अटकेत...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत राम मंदिरातील मुर्त्यांची चोरी करणाऱयांना जेरबंद केले आहे.

जालना: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत राम मंदिरातील मुर्त्यांची चोरी करणाऱयांना जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

धनंजय वसंतराव देशपांडे (रा. जांबसमर्थ ता. घनसावंगी जि. जालना) यांनी 22/08/2022 रोजी पोलिस ठाणे घनसावंगी येथे येवून तक्रार दिली की, जांबसमर्थ येथील राममंदिर येथे ते पुजारी व व्यवस्थापक म्हणून काम करतात. 21/08/2022 रोजी रात्री 21.00 ते दिनांक 22/08/2022 रोजी 06.00 वा दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी राम मंदिरामध्ये प्रवेश करुन गाभाऱ्यातील श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता व हनुमान तसेच इतर देवतांच्या मुर्त्या चोरुन नेल्या आहेत. अशा तक्रारी वरुन पोलिस ठाणे घनसावंगी येथे कलम 457,380 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल असुन नमुद गुन्हयाचा तपास पोलिस अधिक्षक  डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्याकडे देण्यात आलेला होता. त्याअनुषंगाने गुन्हयाचे घटनास्थळास पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्या करीता पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सुचना व मार्गदर्शन करुन त्यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकरी व अंमलदार यांचे वेगवेगळे तपास पथके तयार करण्यात आले होते. 

सर्व तपास पथके हे गुन्हयाचा गुप्त बातमीद्वारा मार्फत तांत्रीक विश्लेषनाद्वारे रेकॉर्ड वरील आरोपींना चेक करुन तसेच सर्व प्रकारे बारकाईने तपास करीत होते. तपासा दरम्यान पथकातील अधिकारी अंमलदार हे संपुर्ण महाराष्ट्रातील बिड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, सोलापुर, कोल्हापुर, अहमदनगर, पुणे, मुंबई, बुलढाणा तसेच कर्नाटक राज्यामध्ये जावुन गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न करीत होते. अखेरीस दरम्यान दिनांक 25/10/2022 ते दिनांक 28/10/2022 रोजी पावेतो तीन दिवस पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग व स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील सर्व अधिकारी अमंलदार असे तपासकामी उस्मानाबाद,सोलापुर, लातुर व कर्नाटक राज्यामध्ये जावुन गुन्हयातील आरोपी व चोरीस केलेल्या मालाचा शोध घेत असतांना बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरुन गुन्हयातील आरोपी शेख राजु शेख हुसेन (रा. कर्नाटक राज्य,ह.मु सांजा नगर रामनगर उस्मानाबाद) यास सोलापुर जिल्हयातून ताब्यात घेतले. 

तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या एका साथीदारासह केल्याचे सांगून चोरी केलेल्या मुर्त्या महादेव शिवराम चौधरी (ओतारी) (रा. संजय नगर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) याचेकडे ठेवल्याचे सांगीतले. त्यावरून त्याच्या साथीदाराचा उस्मानाबाद, सोलापुर लातुर, कर्नाटक राज्यामध्ये तपास पथका मार्फत शोध घेत आहोत. महादेव शिवराम चौधरी (ओतारी) यास ताब्यात घेवून गुन्हयातील गेला मालापैकी श्रीराम-सीता माता, भरत, शत्रुघ्न, दोन हनुमान अशा एकुण 05 रामपंचायतन मुर्त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत मुर्त्या या फरार आरोपी घेवून गेल्याचे सांगीतले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,शशिकांत तवार, संदिप ओहोळ त्याचप्रमाने सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विनोद गडदे, कृष्णातंगे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, रंजीत वैराळ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, देविदास भोजने, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, भागवत खरात, किशोर पुंगळे, योगेश सहाणे, धिरज भोसले, कैलास चेके, रवी जाधव मपोना / चंद्रकला शडमल्लु, गोदावरी सरोदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना तसेच विशेष तपास पथकातील संजय लोहकरे पोलिस निरीक्षक, औरंगाबाद (ग्रामीण) सपोनि योगेश धोंडे, पोउपनि सतोष मरळ, गणेश राऊत, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन पोलिस ठाणे घनसावंगी व अंमलदार रामप्रसाद रंगे, रामेश्वर जाधव, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप तसेच पथकातील ईतर अंमलदार यांनी केली आहे.

जालना पोलिसांनी सापळा लावून मोटार अडवली अन्...

जालना पोलिसांनी पेट्रोल पंपावरील रक्कमेबाबत केला गुन्हा उघड...

जालन्यामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तलवारींचा साठा जप्त...

जालना पोलिस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी यांची निवड

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: jalna crime news police arrest for jambsamrth ram mandir ido
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे