Video: पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले प्रकरणी डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले...

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी प्रकरणी एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी प्रकरणी एलसीबीचे प्रमुख किरणकुमार बकाले यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.

मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी एलसीबीचे प्रमुख निरिक्षक किरणकुमार बकाले यांची मंगळवारी रात्री उशीरा बदली केली होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात मराठा समाजातील मान्यवरांसह सर्वसामान्यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत बकाले यांच्या निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर उशीरा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी गुरुवारी रात्री किरणकुमार बकाले यांच्या निलंबानाचे आदेश काढले आहेत.

मराठा समाजावर अत्यंत हीन भाष्य करणारा नीच प्रवृत्तीचा पीआय किरण बकाले याला तात्काळ निलंबित करावे. एखाद्या पोलिसाने कोणत्याही समाजाबद्दल आकसभाव ठेवणे हे सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशी प्रवृत्ती पोलिस खात्यातून हद्दपार करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती.

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: jalgaon pi kiran kumar bakale suspended offensive remarks ab
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे