धक्कादायक! सुनेने विळ्याने वार करून केली सासूची हत्या

सासू द्वारकाबाई आणि सुन उज्वला यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की सुनेने सासूची विळ्याने हत्या केली.

जळगाव: सासू आणि सुनेत वाद होत असल्यामुळे सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 2) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मोटार थांबवून झडती घेतली असता बसला धक्का...

भुसावळ शहरातील गजानन महाराज नगर भागात सुनेने सासूच्या डोक्यात आणि पाठीवर विळा मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा मृत्यू झाला आहे. द्वारकाबाई सोनवणे (वय 75) असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे.

पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात मास्टरमाइंड अलगद अडकले...

गजानन महाराज नगरमधील पद्माबाई विद्यालय येथे गेल्या 8 वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे आणि त्यांचा परिवार राहत आहे. बुधवारी रवींद्र सोनवणे हा बाहेर गेले असताना सासू द्वारकाबाई आणि सुन उज्वला यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की सुनेने सासूची विळ्याने हत्या केली.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आणि प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी धाव घेतली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

धक्कादायक! योगेश याने मुलीला तू जाऊन झोप असे सांगितले अन्...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: jalgaon mother in law killed by daughter in law in bhusawal
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे