धक्कादायक! थेट वृध्द महिलेचा कानच कापला अन्...
दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात वृध्द महिलेचे कान कापून 10 ते 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.जळगाव : रेल (ता. धरणगाव) गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात वृध्द महिलेचे कान कापून 10 ते 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसकाका पुस्तकाचे प्रकाशन! पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०) या गावातील मंगल नथ्थू पाटील याच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने विमलबाई पाटील यांच्या घरात घुसून कानातील सोने काढून घेण्यासाठी थेट वृध्द महिलेचा कानच कापला. शिवाय, डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाला.
दरम्यान, आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला. जखमी झालेल्या वृध्द महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर सिनेस्टाईल दरोडा...
औरंगाबादमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती; कुऱ्हाडीने तोडल्यानंतर केला जल्लोष...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...