जळगावमध्ये अनेक वाहनांमध्ये भीषण अपघात; पाच ठार...

टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली.

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ आज (शुक्रवार) पहाटे तीन वाजेच्या सुमारास दूध टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. 

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; पुण्यातील चार जणांचा मृत्यू; पाहा नावे...

रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध भरण्याचे करण्याचे काम सुरू होते.

नागपूरजवळ ट्रक-मोटारीमध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली.

अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

दरम्यान, अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे. मुक्ताईनगर पोलिसांकडून  याबाबतचा पुढील तपास केला जात आहे.

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: jalgaon accident news milk tanker and truck 5 people died
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे