Video: जालना येथे चोरट्यांनी 28 लाखांसह एटीएम मशीन पळवले

चोरट्यांनी एटीएम मशीन लंपास केले आहे. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे एटीएम मशीन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून नेताना चोरटे दिसत आहेत.

जालना: येथील औद्योगिक वसाहतीत (midc) असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन (ATM) 28 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह चोरट्यांनी स्कोर्पिओ गाडीतून पळवून नेले आहे. चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांने आपली हालचाल दिसू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर वाढदिवसाचा स्प्रे मारला होता.

Video: एटीएमचा पिन 'असा' हॅक होऊ शकतो...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना-औरंगाबाद महामार्गावरील नागेवाडी येथे पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेलगत याच बँकेचे डायबोल्ड कंपनीचे एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन लंपास केले आहे. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे एटीएम मशीन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून नेताना चोरटे दिसत आहेत.

चालकाने 4 कोटींसह एटीएम व्हॅन पळवली...

चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण ओळखू येऊ नये म्हणून तोंडाला मास्क बांधले होते. तसंच आपली हालचाल दिसू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर वाढदिवसाचा स्प्रे मारला होता. सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे मोठी रक्कम या एटीएममध्ये ठेवण्यात आली होती. या एटीएममध्ये रोख 28 लाख 67 हजार 600 रुपये होते. या रक्कमेसह 4 लाखाचे मशीन असा 32 लाख 67 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून एटीएम चोरीचा गुन्हा उघड...

या प्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी तक्रार दिली असून, चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: jalana crime news thief atm machine robbery run away cctv
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे