देवेन भारती यांची मुंबईचे नवे विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती...

मुंबईचे नवे विशेष पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

मुंबईः मुंबईचे नवे विशेष पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी राज्य सुरक्षा महामंडळ, एटीएस प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही विशेष पोलिस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रशासकीय निकड म्हणून पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाला पोलिस आयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, "अपर पोलिस महासंचालक" दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील "संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी" हे "अपर पोलिस महासंचालक" दर्जाचे पद, पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या पदाचे नामाभिधान "विशेष पोलिस आयुक्त" असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. विशेष पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई, हे पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलिस सह आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करतील.

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नवीन आदेश...

रितेश कुमार यांनी स्विकारला पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार!

राज्यातील ३० वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या; पाहा यादी...

पोलिस अक्षीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी...

राज्यातील 15 पोलिस निरीक्षक झाले सहाय्यक आयुक्त; पाहा यादी...

पोलिस अधिकाऱयांच्या नियुक्त्या; पाहा ठिकाण आणि नावे...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: IPS Deven Bharti appointed as Mumbai s first special commiss
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे