उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी

चंद्रपूरला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल कुलकर्णी (भापोसे) यांची उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उस्मानाबादः चंद्रपूरला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल कुलकर्णी (भापोसे) यांची उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच आपला पदभार घेणार आहेत. 

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे...

उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक नीवा जैन यांची २० एप्रिल रोजी नागपूरला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे डॉ. अक्षय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांना नागपूर येथुन मुक्त करण्यात आले नव्हते, त्यामुळे उस्मानाबादला रुजू झाले नव्हते. गृह विभागाने फेर आदेश काढून अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती उस्मानाबाद पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. व त्यांच्या पुर्वीच्या आदेशात फेरबदल करुन डॉ. अक्षय शिंदे यांना जालना व अतुल कुलकर्णी यांना उस्मानाबाद पोलिस अधिक्षक पदी नेमण्यात आले आहे.

आजचा वाढदिवस: अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी...

दरम्यान, नीवा जैन यांना नागपूरला गेल्या नंतर उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षकपदाचा प्रभारी पदभार अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे देण्यात आला होता. अखेर उस्मानाबादच्या रिक्त पोलिस अधीक्षकपदी चंद्रपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालना पोलिस अधीक्षकपदी अतुल कुलकर्णी यांची निवड

अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदिवासींना दिला मदतीचा हात...

अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची दबंगगिरी...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: ips atul kulkarni as a osmanapad police superintendent new l
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे