अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे.

पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. 

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
पुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १८ सप्टेंबर २०२० रोजी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार हाती घेतला होता. अगदी पहिल्या दिवसापासून गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवून होते. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन कसे होईल यावर सातत्याने भर दिला आहे. मोक्का अंतर्गत मोठ्या कारवाया केल्या आहेत. यामुळेच की काय त्यांची मोक्का किंग म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर केलेल्या कारवायांमुळे शहरामध्ये एक दबदबा निर्माण केला आहे. पुणे आयुक्तलयाची जबाबदारी पार पाडत असताना ते आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घेतात. जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या चेहऱयावरील तेज, स्मितहास्य सतत पाहायला मिळते. याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत...

श्री. अमिताभ गुप्ता यांचे बालपण आणि शिक्षण उत्तर प्रदेशात झाले. विद्यार्थी दशेच्या काळापासूनच ते आरोग्याची काळजी घेत आहेत. खाण्याच्या बाबतीत तर काटेकोरपणे पालन. 'समोर कितीही पदार्थ असले तरी गरजेएवढेच खाणे. विविध पदार्थ समोर दिसतात म्हणून खात बसत नाही. वयोमानानुसार आहारात बदल करायला हवा. उदा. लहानपणी जेवढ्या पोळ्या खात असतो तेवढ्या पोळ्या ४०शी नंतर खावून चालणार नाही. वयोमानानुसार बदल करत राहायला हवा अन्यथा शारिरीक आणि मानसिकतेवरही परिणाम होत जातो. शारिरीक आणि मानसिकता जपायची असेल तर आहार आणि व्यायाम हा हवाच, हेच माझ्या आरोग्याच्या यशाचे गमक आहे,' असे श्री. गुप्ता सांगतात.

पुणे शहराच्या आयुक्तपदाची जबाबदारी म्हटल्यावर ताणतणाव असणारच. पण, योग्य काळजी घेत असल्यामुळे वयाच्या ५२व्या वर्षीही प्रकृती सडपातळ आहे. शरीरात स्थूलपणा नसल्यामुळे कंटाळा येत असल्याचे जाणवत नाही. व्यायामामुळे तर नेहमीच ताजेतवाणा असल्यासारखे वाटते. पण, हे काही एका दिवसात होत नाही. त्यासाठी पहिल्यापासूनच शरिराची काळजी घेणे आवश्यक आहे. एखादी जबाबदारी जेंव्हा तुमच्यावर येते तेंव्हा आरोग्याची काळजी सद्धा घ्यावीच लागते.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलिस दलात तब्बल ३० वर्षे कार्यरत आहेत. या काळामध्ये विविध जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. पोलिस दलातील नोकरी म्हटल्यावर ताणतणाव असतोच. शिवाय, झोपेचेही गणित बिघडत असते. पण, काम आणि आरोग्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टींकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. कामाच्या ठिकाणी काम आणि आरोग्यासाठी व्यायाम. आरोग्याची काळजी घेतली तरच आयुष्यमान वाढणार आहे. आयुष्य वाढवायचे असेल तर व्यायाम करायलाच हवा. वयोमानानुसारही व्यायामात बदल करता येतो. शाळेत असताना एकत्रीत मैदानी खेळ खेळता येत असल्यामुळे व्यायाम होतो. पण, पुढे जसजसे वय वाढत जाते तसतशा जबाबदाऱया वाढतात. एकट्याला व्यायाम करण्यासारख्याही अनेक गोष्टी आहेत. उदा. पोहणे, सायकलींग करण्यासारखे व्यायाम एकट्यालाही करता येतात. त्यासाठी कोणाची आवश्यकता लागत नाही. व्यायामासाठी कोणतेही कारण पुढे करून चालणार नाही. व्यायाम केला तरच आयुष्य वाढणार, हे लक्षात ठेवून जरी व्यायाम केला तरी खूप झाले. दिवसातील २४ तास काम करणे आणि व्यायाम करणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजेत, असेही श्री. गुप्ता सांगतात.

सविस्तर मुलाखत पुस्तक खरेदी करून जरूर वाचा...

पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...
अमिताभ गुप्ता : आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
पौर्णिमा तावरे : व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे पाहिले स्वप्न!
रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
अशोक इंदलकर : लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील : कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
प्रताप मानकर : कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी!
अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!

डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!

'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: ips amitabh gupta interview on policekaka special book see d
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे