दोन वर्षाच्या मुलाने केला आईचा खून; कसा तो पाहा...

घरात ऑफिसची झूम मीटिंग करत होती. यावेळी या दोन वर्षीय मुलाच्या हाताला वडिलांची हॅंडगन लागली. त्याने घरात झूम कॉलवर मीटिंग करत असलेल्या आईवर चुकून गोळी झाडली.

मध्य फ्लोरिडा (अमेरिका) : वडिलांच्या बेजवाबदारपणामुळे कुठेही टाकून ठेवलेली बंदूक दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या हाताला लागली अन् त्याच्या हातून आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फ्लोरिडा येथे घडली आहे. या प्रकरणात वडिलांना अटक झाली.

शमाया लीन असे मृत आईचे तर २२ वर्षीय वोंड्रे एवरी असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे. मध्य फ्लोरिडातील चौकशी अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी सांगितले की, या मुलाला बॅगपॅकमध्ये वडिलांची बंदुक सापडली होती. त्या बंदुकीचा त्याने एक फायर केला. बंदुकीतून निघालेली गोळी त्याची आई शमाया लिनच्या डोक्यात लागली. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.

चिमुकल्याकडून गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा शमाया घरात ऑफिसची झूम मीटिंग करत होती. यावेळी या दोन वर्षीय मुलाच्या हाताला वडिलांची हॅंडगन लागली. त्याने घरात झूम कॉलवर मीटिंग करत असलेल्या आईवर चुकून गोळी झाडली. ज्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेचा तपस करणाऱ्या अल्टामोटे स्प्रिंग्स पोलिसांनी सांगितले की, २२ वर्षीय वोंड्रे एवरीला मंगळवारी अटक केली गेली. त्याच्यावर हत्या आणि बेजबाबदारपणे बंदुक ठेवल्याची केस दाखल केली आहे.
       
झूम कॉलवर असलेल्या तिच्या सहकाऱ्याने लगेच इमरजन्सी सर्व्हिस ९११ ला कॉल केला. त्याने सांगितले की, 'शमायाला व्हिडिओ कॉल सुरू असताना बंदूकीच्या गोळीचा आवाज ऐकायला आला आणि लिन पडताना दिसली. यावेळी तिचं बाळ मागे रडत होते. यावेळी तिचा जोडीदारही घरी नव्हता. एवरी घरी पोहोचला तेव्हा फरशीवर सगळीकडे रक्त पसरलेलं  होते. त्याने इमरजन्सी सर्व्हिसला सांगितलं की, जेव्हा घटना घडली तेव्हा त्याची सहकारी  कॉम्प्युटरवर ऑफिसचे काम करत होती. लिनचा मृत्यू जागेवरच झाला होता. डॉक्टरांनी  मृत घोषित केले.'

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: international crime news mother on zoom meeting and son firi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे