इंदूरमध्ये झोपेतच काळाचा घाला; सात जणांचा होरपळून मृत्यू
इंदूरमध्ये असलेल्या विजय नगरमधील एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी (ता. ६) रात्री उशिरा भीषण आग लागली.इंदूर (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये असलेल्या विजय नगरमधील एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी (ता. ६) रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 8 जण गंभीररित्या भाजले आहेत. सर्व जखमींना एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
नागपूरजवळ ट्रक-मोटारीमध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्वजण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.
7 charred to death after fire breaks out in Indore residential building
— ANI Digital (@ani_digital) May 7, 2022
Read @ANI Story | https://t.co/mpqhd1s1yd#Indore #MadhyaPradeshFireIncident pic.twitter.com/eb12W5WelK
मृतांमध्ये ईश्वर सिंग सिसोदिया (45), नीतू सिसोदिया (45), आशिष (30), गौरव (38), आकांक्षा (25) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 आणि 45 वयोगटातील दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे.
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...