बापरे! लग्नानंतर खरा प्रकार लक्षात आल्यावर सर्वांनाच बसला धक्का...

एका महिलेला लग्नाच्या दहा महिन्यांनी लक्षात आले की आपले लग्न एका महिलेशीच लावण्यात आले आहे.

जकार्ता (इंडोनेशिया): एका महिलेला लग्नाच्या दहा महिन्यांनी लक्षात आले की आपले लग्न एका महिलेशीच लावण्यात आले आहे. यानंतर महिलेला धक्का बसला असून, तिने न्यायालयात धाव घेतली आहे.

तिसऱया लग्नामुळे चर्चेत असलेल्या खासदाराचा संशयास्पद मृत्यू...

एक महिलेने न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, 'ज्या व्यक्तीसोबत पुरुष समजून लग्न केलं, तो पुरुष नसून महिला आहे. आरोपी इरायनी या महिलेने आपली ओळख लपवून माझ्यासोबत लग्न केले आहे. लग्नाच्या दहा महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली.' एका डेटिंग ऍपवर इरायनी आणि पीडित महिलेची भेट झाली होती. इरायनी एका पुरुषाप्रमाणे पीडित महिलेला भासला होता. एका सर्जन सोबत त्याचा व्यवसाय असल्याचे इरायनीने पीडितेला सांगितले होते. तीन महिन्यांची चर्चेनंतर आणि ओळखीनंतर या दोघांनी एकमेकांशी लग्न केले होते. लग्नानंतर इरायनी पीडितेच्या घरात राहू लागला. पण लग्नानंतर पीडित महिलेच्या आई-वडिलांना संशय आला. त्यामुळे इरायनी पीडित महिलेला घेऊन दुसरीकडे राहायला गेला. 

पाकिस्तानमध्ये रात्री १० नंतर लग्न करण्यास बंदी; कारण पाहा...

एक भाड्याचं घर घेऊन दोघे राहू लागले. पण, तिथे पीडितेवर बंधने घातली. मुलीशी संपर्क होत नाही म्हणून आईवडील अस्वस्थ झाले. त्यांनी पोलिसांनी याबाबत सांगितले. पोलिसांनी इरायनीला शोधून काढले आणि खरी माहिती समोर आली. यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

पाकिस्तानमध्ये युवतीच्या बाबतीत घडली धक्कादायक घटना...

लग्नानंतरच्या दहा महिन्याच्या काळात लाखो रुपयांचा गंडाही घातला होता.  लग्नानंतर इरायनीने एकदाही महिलेला स्पर्श केला नव्हता. तो नेहमी काही ना काही कारण काढून लांब राहायला. शरीर संबंध ठेवताना पीडितेच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जात होती. त्यामुळे अनेक महिने याप्रकाराचा भांडाफोड होऊ शकला नव्हता, असे पीडितेने सांगितले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: indonesia crime news women register complaint after marriage
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे