काश्मीरमध्ये जवानांनी घेतला बदला; दहशतवादी ठार...

जम्मू-काश्मीर पोलिस आणि सैन्य दलाकडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. शोपियान चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय पाच जवानांच्या हत्येचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

पुंछ नंतर शोपियान येथील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापूर्वी भारतीय सैन्य दलाने सोमवारी अनंतनाग आणि बांदीपोरा येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिस आणि सैन्य दलाकडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. शोपियान चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दहशतवाद्यांचा खात्मा केला त्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त कऱण्यात आला आहे. अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचे नाव मुख्तार शाह आहे.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (ता. ११) चकमक झाली. या चकमकीत जेसीओसह पाच जवान हुतात्मा झाले होते. 

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: indian army killing 5 terrorists in shopian jammu kashmir
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे