अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली, चिनी सैनिक ताब्यात...

चिनी लष्करातील २०० सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळून भारतीय सिमेमध्ये घुसखोरी केली आणि या ठिकाणी सैनिक तैनात नसणाऱ्या बंकर्सची नासधूस केल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली.

नवी दिल्ली :  अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागामध्ये भारतीय सीमेत चीनकडून पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिनी घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळून लावला आहे. घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारताने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

चिनी लष्करातील २०० सैनिकांनी तिबेटच्या सीमेजवळून भारतीय सिमेमध्ये घुसखोरी केली आणि या ठिकाणी सैनिक तैनात नसणाऱ्या बंकर्सची नासधूस केल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या बूम ला आणि यांग्त्से प्रदेशामध्ये मागील आठवड्यामध्ये हा घुसखोरीचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये घुसून भारतीय सीमेवरील रिकाम्या बंकरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या सुमारे 200 सैनिकांनी भारतीय सीमेच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी चीन सैनिकांचा हा कचट उधळून लावत त्यांना हाकलून लावले आहे. ही घटना गेल्या आठवड्यात बुम ला आणि यांग्त्से बॉर्डर जवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) घडली असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैनिकांनी सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैनिकांनी तीव्र विरोध करत काही चीनी सैनिकांना तात्पुरते ताब्यात घेतले.

भारत-चीन सीमा अद्याप औपचारिकपणे विभागण्यात आलेली नाही. याच कारणाने सीमेबाबत दोन्ही देशांमध्ये वाद आहे. मात्र, दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राखण्यासाठी अनेक करार करण्यात आले आहेत. दोन्ही देश आपल्या सीमा लक्षात घेऊन गस्त घालत राहतात. अनेकदा दोन्ही देशांचे सैनिक एकाच वेळी एकाच ठिकाणी पोहोचतात तेव्हा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तणाव वाढतो.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: india foils chinese incursion into arunachal pradesh many so
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे