प्रिय ग्राहक, अपना जनता बँक द्वारे मिळवा पर्सनल लोन...

पुणे पोलिसांनी सांगितले या मेसेजमागचे गौडबंगाल...

सायबर चोरटे ग्राहकांना मोबाइलवर मेसेज पाठवून 2 टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवतात.

पुणे: कोरोनामुळे दीड वर्षांपासून देशात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. दरम्यानच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सायबर चोरटे वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत नागरिकांची लूट करत आहेत. याबाबत पुणे पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

खरारक! पुणे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पकडले चोरांना

नोकरी किंवा व्यवसाय ठप्प झाल्यानं कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकजण कर्ज घेण्याकडे वळत आहेत. अशा लोकांना कमी व्याजात कर्ज देण्याच आमिष दाखून सायबर चोरटे त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत. तुम्हालाही कमी व्याजदराने कर्ज देण्याबाबत मेसेज आला असेल तर वेळीच सावधान होण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरून देण्यात आली आहे. सायबर चोरटे अपना जनता बॅंक, मुद्रा फायनान्स, जनलक्ष्मी फायनान्स येथील कर्मचारी असल्याचा दावा करून लोकांची फसवणूक करत आहेत. तत्पूर्वी सायबर चोरटे ग्राहकांना मोबाइलवर मेसेज पाठवून 2 टक्के व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवतात. त्याचबरोबर कर्ज घ्यायचं असेल तर संपर्क साधण्यासाठी त्यांनी एक मोबाइल क्रमांक देखील दिला आहे.

कमी व्याजात कर्ज मिळत आहे म्हणून अनेकजण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. यानंतर आरोपींकडून बनावट कर्ज मंजुरीचे पत्र शेअर केले जात आणि जीएसटी टॅक्स आणि प्रक्रिया शुल्क अशी विविध कारणे देत ग्राहकांची लूट केली जात आहे. त्यामुळे असा मेजेस तुम्हालाही आला असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

दरोडयाच्या तयारीत असणा-या टोळीस युनिट ६ ने केले जेरबंद...

तुम्हाला पैशाची कितीही गरज असली तरी, अशाप्रकारे ऑनलाइन लोन घेण्यासाठी कोणत्याही स्वरुपात पैसे भरू नका. तसेच कर्जाच्या नावाखाली फसवणूक होत, असल्याचा कसलाही संशय आल्यास त्वरित सायबर सेलकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

पाटस येथील दुहेरी हत्याकांडातील चौघे आरोपी जेरबंद

धक्कादायक! पुण्यात महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

पुणे पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल; कोणते ट्विट पाहा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: if you have received messages from apna janta bank beware pu
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे