बापरे! दिवंगत पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा ऐकून बसला धक्का...
मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात पैसे घालवले आहेत. यामुळे मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.हैद्राबाद: एका 16 वर्षीय दिवंगत पोलिस अधिकाऱ्याचा मुलाने मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात तब्बल 36 लाख रुपये घालवले आहेत. अंबरपेट भागात राहणाऱ्या या मुलाने ऑनलाईन गेम खेळण्यासाठी आईच्या बँक खात्याचा वापर केला आहे.
युपीआय व क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे घेतले काढून...
हैद्राबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आपल्या आजोबांच्या मोबाईलवर एक फ्री फायर गेमिंग ऍप (Free Fire App) डाउनलोड केले होते. गेम खेळण्यासाठी सुरुवातीला 1500 रुपये आणि नंतर बँक खात्यातून 10 हजार रुपये लागणार होते. त्याला खेळाचे व्यसन लागल्यानंतर तो कुटुंबाला न सांगता यासाठी पैसे खर्च करत होता. त्याने तब्बल 36 लाख रुपये घालवले आहेत.
कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला अन्...
मुलाची आई पैसे काढण्यासाठी बँकेत गेली त्यावेळी पैसे नसल्याचे समजताच धक्का बसला. खात्यातून एकूण 27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. दुसऱया बँकेतून खात्याचा तपास केला तर त्यातूनही 9 लाख रुपये गायब झाले होते. महिलेने सायबर क्राइमकडे याबाबत तक्रार केली आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, 'पतीच्या मृत्यूनंतर आलेली रक्कम तिने दोन बँकेत ठेवली होती. मात्र, मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात पैसे घालवले आहेत. यामुळे मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
'मोबाईल सिम बंद होणार आहे. केवायसी करा' असा मेसेज आला तर...
युवकाने दिवंगत वडिलांचे लाखो रुपये ऑनलाईनमध्ये गमावले...
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लग्न करायचे आहे; असे म्हणाली अन्...
Video: सायबर गुन्हेगार ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात अन्...
मी तुझ्या आत्याचा मुलगा बोलत आहे, असे म्हणाला अन्...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...