धक्कादायक! बलात्कारानंतर युवतीचा खून अन् मृतदेहावरही बलात्कार...
एका २५ वर्षीय युवकाने एका २४ वर्षीय युवतीवर बलात्कार करून हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला.हैदराबाद : एका २५ वर्षीय युवकाने एका २४ वर्षीय युवतीवर बलात्कार करून हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहावर देखील बलात्कार केल्याची घटना हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असलेल्या चौतुप्पल गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बापरे! गर्भवतीची हत्या पती आणि मावशीच्या अनैतिकसंबंधातून...
चौतुप्पल येथील एका गोडाऊनमध्ये एका युवकाने बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे ती मृत होईपर्यंत तिची कवटी फोडली आणि नंतर तिच्या पार्थीवावर लैंगिक अत्याचार केले. या भीषण गुन्ह्याच्या घटनास्थळापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या मलकापूर गावातील लेबर कॅम्पातून आरोपीला बुधवारी पकडण्यात आले. आरोपी बांधकाम पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या घराजवळील गोडाऊनमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. तिचा पती जवळच्या महाविद्यालयात वॉचमन म्हणून काम करत होता. त्यामुळे ती महिला दिवसभर घरी एकटीच राहत होती. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागावर होता. गेल्या ९ मे रोजी आरोपीने गोडाऊनमध्ये घुसून महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर तासाभरातच तिच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केली. नराधम इतक्यावरच थांबला नाही तर त्या नराधमाने वारंवार तिच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला.
बापरे! गर्भवती महिलेवर रुग्णालयातच बलात्कार; शिवाय...
या घटनेनंतर आरोपीने तिचे सोन्याचे दागिने चोरून तेथून पळ काढला. पीडितेच्या पतीने दिलेल्या पोलिस तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कार, खून, एससी /एसटी ऍक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर संबंधित कलमांचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ११ मे रोजी गुन्ह्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर गावातून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिने जप्त केले आहेत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती चौतुप्पलचे सहाय्यक पोलिस आयुक्त उदय रेड्डी यांनी दिली.
धक्कादायक! महिलेवर अॅसिड हल्ला मग तुरुंगवारी सुटल्यानंतर बलात्कार...
भयानक! एचआयव्हीग्रस्त मुलीवर बलात्कार; गुप्तांग फाटले...
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...