बापरे! कपाट उघडताच पैशांची बंडले पाहून बसला धक्का...

छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक कपाट उघडले आणि त्यांना धक्काच बसला. एका मोठ्या कपाटामध्ये ५०० च्या नोटांचे अनेक बंडले ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

हैदराबाद : आयकर विभागाने येथे एका औषध निर्माण करणाऱया कंपनीवर छापा टाकला असून, तब्बल ५५० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. एका कपाटात ५०० च्या नोटा आढळून आल्या असून, ही रक्कम १४२ कोटी ८७ लाख एवढी असल्याची माहिती समोर येत आहे. छाप्यादरम्यान सापडलेल्या या रोख रक्कमेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

काश्मीरमध्ये जवानांनी घेतला बदला; दहशतवादी ठार...

आयकर विभागाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार ज्या कंपनीवर छापा टाकण्यात आला ती कंपनी परदेशात औषधे पाठवणारी कंपनी आहे. अमेरिका, युरोप, दुबई आणि आफ्रीकन देशांमध्ये या कंपनीने निर्माण केलेली औषधांची निर्यात केली जाते. छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक कपाट उघडले आणि त्यांना धक्काच बसला. एका मोठ्या कपाटामध्ये ५०० च्या नोटांचे अनेक बंडले ठेवण्यात आल्याचे दिसून आले. 

बापरे! प्रवासादरम्यान फोन आला अन् सगळंच संपल...

दरम्यान, आयकर विभागाने बुधवारपासून राज्यामधील ५० वेगवेगळ्या ठिकाणीनी छापेमारी केली आहे. या छाप्यांमध्ये आयकर विभागाला खात्यांची माहिती असणारी पुस्तकं, डिजिटल उपकरणे, पेन ड्राइव्ह आणि बरीच कागदपत्रे हाती लागली आहेत. अनेक बनावट तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात आल्याचं दाखवण्यात आले होते. हा काळापैसा लपवण्यासाठी व्यवहार झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आलेले तसेच जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचेही पुरावे या छापेमारीमध्ये सापडले आहेत. या छापेमारीमध्ये पैसे भरुन ठेवलेले एक संपूर्ण कपाट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल नेटवर्किंगवर या कपाटाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

 

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: hyderabad crime news raid on medicine company money found a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे