धक्कादायक! प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही...

मी, प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही, असे म्हटल्यामुळे घरात पुन्हा वाद झाला.

रांची (झारखंड): एका युवक आणि युवतीचे प्रेमसंबध होते. पण, युवतीच्या घरच्यांचा प्रेमाला विरोध होता. यामुळे युवतीला दुसऱया गावात ठिकाणी विवाह जमवला होता. युवती विवाहाला तयार होत नसल्यामुळे तिचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

हनिमूनदरम्यान नवऱयाकडून घडली धक्कादायक घटना...

ओलकी कुमारी (वय 18, रा. मालदा) असे खून करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे. ओलकी कुमारीचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, युवतीच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता. यामुळे ओलकी कुमारीला नातेवाईक संजीव कुमार यादव यांच्या घरी ठेवण्यात आले होते. यादव यांच्या घरी ठेवल्यानंतर दुसऱया युवकासोबत विवाह ठरविण्यात आला होता. पण, ओलकी कुमारी या विवाहाला तयार होत नव्हती. मी, प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही, असे म्हटल्यामुळे घरात पुन्हा वाद झाला. यादव कुटुंबातील तिघांनी मिळून तिला मारहाण करत गळा दाबून हत्या केली.

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

ओलकी कुमारीची हत्या केल्यानंतर मृतदेह घरात ठेवला आणि नंतर तलावामध्ये फेकून दिला होता. पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविला होता. गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे अहवालात म्हटले होते. पोलिसांनी तपास करून सुंदर यादव, संजीव यादव आणि सुधीर यादव यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! मालकाच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमातून घडले दुहेरी हत्याकांड

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: honor killing grandfather kills granddaughter bengal girl ki
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे