हिज्बुलचा टॉप मोस्ट कमांडर मशिदीतून बाहेर पडला अन् काही क्षणात...
हिज्बुल मुजाहिदीनच्या महत्वाच्या पाच कमांडर्सपैकी एक असलेला इम्तियाज आलम उर्फ बशीर अहमदचा खात्मा करण्यात आला आहे.कराची (पाकिस्तान): हिज्बुल मुजाहिदीनच्या महत्वाच्या पाच कमांडर्सपैकी एक असलेला इम्तियाज आलम उर्फ बशीर अहमदचा खात्मा करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयसोबत झालेल्या वादानंतर आयएसआयनेच त्याचा काटा काढल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. रावळपिंडीमध्ये नमाज पढून मशिदीतून बाहेर पडल्यानंतर बशीरवर गोळीबार झाला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
इम्तियाज आलम उर्फ बशीर हा हिज्बुल मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य होता. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात बशीर अहमदचा मोठा हात होता. यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित झाल्यानंतर त्याने पाकिस्तानात आसरा घेतला होता. इम्तियाज आलमचे मूळ गाव जम्मू काश्मीरच्या कुपवडा जिल्ह्यतील बाबरपोरा आहे. परंतु, आलम पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे राहत होता.
इम्तियाज आलमवर 23 मे 2019 रोजी काश्मीरमध्ये अल- कायदाची शाखा असणाऱ्या अंसार गजवत-उल-हिंदचा मुख्य कमांडर जाकिर मुसाची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला होत. मे 2017 ला आलमने पाकिस्तान समर्थक हिज्बुल मुजाहिदीन सोडले. त्यानंतर त्याने खिलाफतची स्थापना केली. मार्च 2007 साल पाकिस्तानी सेनेने इम्तियाज आलमला ताब्यात घेतेले होते. त्यावेळी त्याने उत्तर विभागाचे कमांडर मोहम्मद शफी दार यांना बळ देण्यासाठी 12 दहशतवाद्यांची टीम पाठवली होती. ISI च्या इशाऱ्यानंतर त्याला सोडण्यात आहे.
पाकिस्तानमध्ये पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक...
पाकिस्तानमध्ये बस-टँकरचा भीषण अपघात, २० जण जागीच ठार...
Video: पाकिस्तानची पहिली हिंदू महिला 'डीएसपी'
पाकिस्तानी पोलिस अधिकाऱयाची प्रेमकहाणी व्हायरल...
इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...
पाकिस्तानात दोन गटांमध्ये तुफान गोळीबार; १० जणांचा मृत्यू
संतापजनक! पाकिस्तानमध्ये बकरीवर केला सामूहिक बलात्कार अन्...
Video: पाकिस्तानमध्ये रिक्षात पळत चढून घेतला महिलेचा 'किस'
अमानुष कृत्य! पाकमध्ये चिमुकलीवर बलात्कार करून गुप्तांगावर केले वार अन्...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...