हिंगोलीतील कुटुंबाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न...

पोलिसांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. राजू चन्नाप्पा हुलगुंडे (रा. माळवट, ता. वसमत) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे.

मुंबई : हिंगोली येथील एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने पोलिसांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. राजू चन्नाप्पा हुलगुंडे (रा. माळवट, ता. वसमत) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे.

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; पुण्यातील चार जणांचा मृत्यू; पाहा नावे...

राजू चन्नाप्पा हुलगुंडे हे गेल्या 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ताडकळस ते पालम या रस्त्याच्या थकीत कामाचे पैसे मिळण्यासाठी ते वारंवार चकरा मारत होते. 25 ऑक्टोबर 2021 पासून ते यासाठी तासतत्याने पाठपुरवठा करत होते. मात्र, पैसे न मिळाल्याने ते नैराश्येत होते.

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांच्या कामाची थकीत रक्कम ही एक कोटींच्या घरात होती. मात्र, त्यांना केवळ 14 लाख रुपयेच मिळाले होते. शिवाय, आंदोलन करत असल्याने आपल्याला धमकावले आणि मारहाण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांनी बांधकाम विभागावर आरोप केले आहेत.

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: hingoli man attempt self immolation with kerosene on family
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे