...अखेर पोलिस अधिकारी तहसीलदार झालाच!

करंदी (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि प्राथमिक शाळेत शिकलेल्या सुपुत्राने एमपीएससीत चार वेळा झेंडा फडकवला आहे. हेमंत आबासाहेब ढोकले असे त्यांचे नाव. शिरूर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिरूर : करंदी (ता. शिरूर) येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि प्राथमिक शाळेत शिकलेल्या सुपुत्राने एमपीएससीत चार वेळा झेंडा फडकवला आहे. हेमंत आबासाहेब ढोकले असे त्यांचे नाव. शिरूर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, अशा विविध पदांच्या चढत्या कमानीने यश मिळवत असताना आता त्यांनी एमपीएससी परीक्षेतून तहसीलदार म्हणून यश मिळविले आहे. शिवाय, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी त्यांनी सुरूच ठेवली आहे.

करंदी येथील अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील हेमंत ढोकले यांचे शालेय शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षणही गावातीलच विद्या विकास मंदिर शाळेत झाले. या दोन्ही ठिकाणी त्यांना शालेय अभ्यासक्रमाबाबत तत्कालीक सर्व शिक्षकांनी ज्या पद्दतीने अध्यापन केले, ते आजही कामाला येत आहे, असे ते सांगतात. त्याचा पहिला प्रत्यय त्यांना सन २०११ मध्ये पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत आला, तर सन २०१७ मध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि सन २०१८ मध्ये मुख्याधिकारी परीक्षेतही त्यांना याच शालेय अभ्यासक्रमाच्या उत्तम बैठकीचा लाभ झाला.

केवळ जिल्हा परिषद शाळेतील अभ्यासाच्या जोरावर इथपर्यंत पोहचल्याची त्यांची भावना असून, शासकीय सेवेत राहून कमी वेळेत मिळविलेल्या दोन परीक्षेतील यश हे त्यांनी करंदीच्या जिल्हा परिषद शाळेला दिले आहे. दरम्यान, सध्या ते लोणंद (जि. सातार) शहरात मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असून, वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतही अभ्यास करून इथपर्यंत यश मिळविण्यात माझ्या संपूर्ण कुटुंबीयांचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुनश्च: एकदा गुलाल...
अस म्हणनाऱया सर्वांचा अभिनंदनाचा वर्षाव आणि आशिर्वाद मी स्वीकारला. हे सगळ स्वीकारताना आयुष्यातला खडतर प्रवास, केलेले कष्ट नकळतपणे डोळयासमोरुन एखादी चित्रफीत फिरावी तशी सगळी दृश्य तरळत होती. पहिल्याच प्रयत्नात निघलेली पोलिस उपनिरीक्षकाची पोस्ट आणि त्याआधीचा हेमंत आणि त्याचे कष्ट यांना मिळालेली ती सुवर्णझळाळी होती. 10 वी पर्यंतचे शिक्षण गावातील शाळेत झाले. आणि त्यानंतरचे कनिष्ठ विद्यालयीन शिक्षण विदयाधाम प्रशाला शिरुर इथले. महाविदयालयीन शिक्षण आण्णासाहेब मगर, हडपसर येथे घेऊन कॅम्पस सिलेक्शन होऊन sytelising Software कंपनी मध्ये मुंबई येथे केलेली नोकरी हा अधिकारी होण्यापूर्वीचा प्रवास आठवला. 2011 ला पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर सलग 3 ते 4 वर्षे मिळालेले अपयश आणि अपयशाने खचून न जाता नवीन जोमाने प्रयत्न करुन कौटुंबिक व प्रशासकीय जबाबदाऱया सांभाळून 2017 साली CO पद मिळविले. परंतु, क्लासवन होण्याची तीव्र इच्छा, स्वप्न स्वस्थ बसून देत नव्हते. पुनश्च: एकदा तयारीला लागलो. प्रशासकीय जबाबदाऱया सांभाळताना कमी मिळणारा वेळ आणि आणि मिळालेल्या वेळेची योग्य प्रकारे सांगड घालून, नियोजनबद्ध Planning करुन अभ्यासाला सुरुवात केली. पूर्व, मुख्य आणि मुलाखत एकामागोमाग टप्पे पार करत कष्टांना शिखर मिळाले. आई-वडीलांचा आशिर्वाद, बायकोची खंबीर साथ व मित्रपरिवाराची सदिच्छा यांच्या जोरावर यश संपादन केले आणि अखेर गरीब शेतकऱाचा मुलगा असंख्य अडथळयांची शर्यत पार करुन मामलेदार (तहसिलदार) झालाच.

Title: hemant dhokale selected as tehsildar success story
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे