बनावट फेवीक्वीकचा व्यवसाय करणाऱ्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल...
बनावट (ड्युप्लीकेट) फेवीक्वीक चा व्यवसाय करणाऱ्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोंदिया: गोंदिया शहरात बनावट (ड्युप्लीकेट) फेवीक्वीक चा व्यवसाय करणाऱ्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८८९० रुपयांचे बनावट फेवीक्वीक जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
फिर्यादी मो. तौकीर मो.कालेखान चौधरी (वय २८, रा. जे. जे. कॉलोनी वजीरपुर अशोक विहार, उत्तरप्रदेश दिल्ली, व्यवसाय-टिम लिडर,सेमिता लिगल अॅडव्होकेट एन्ड सॉलिसिटर) यांनी कंपनी तर्फे त्यांनी सर्व लिगल काम पाहण्याकरीता प्राधिकृत केले असल्याचे कळवून तक्रार केली होती की, सेमिता लिगल फर्म, नोयडा, दिल्ली पिडीलाईट कंपनीशी संलग्नीत असून पिडी लाईट कंपनी च्या माध्यमाने सर्व लिगल वस्तू या फर्मतर्फे पाहिली जातात. पिडीलाईट कंपनीच्या नावाने काही दिवसां पासून गोंदिया येथे बनावटी (ड्युप्लीकेट) वस्तू , साहित्य, वस्तू तयार करून विक्री केली जात असल्या बाबत व बोगस फेविक्वीक च्या विक्रीमुळे कंपनीचे खूप नुकसान होत असल्याचे सांगीतले होते. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया अशोक बनकर यांनी सदर बाबत ची वस्तुस्थिती जाणून घेवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत पोलिस निरीक्षक स्था.गु.शा.यांना आदेशित केले होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी स्था. गुन्हे शाखेतील पथकासह सदर बाबीची संपूर्ण शहानिशा करून गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त खात्रीशिर माहीती अंती दिनांक २४/०३/२०२३ रोजी सायंकाळी बजाज ट्रेडर्स चे मालक १) श्याम मोहनलाल बजाज २) दिपक बच्चुमल लिलवानी ३) विवेक हरिशंकर गुप्ता यांना बनावटी (डूप्लीकेट) फेविक्वीक विक्री करताना, बाळगताना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या क्र.१ ते २ यांचे बजाज ट्रेडर्स दुकानातून ४७९ नग फेविक्वीक किंमत २३९५/- व क्र.३ यांचे घरून किंमती ६४९५ रुपये असा एकूण ८८९०/- रूपयाचा पिडीलाईट कंपनीचे नावाचे बनावटी (डयुप्लीकेट) फेविक्विक टयुब माल जप्त करण्यात आले आहे. क्र.४ प्रकाश खत्री रा. बिलासपुर (छ.ग.) हा ईसम गोंदिया येथे नमुद तिघांना तसेच इतरांना सुध्दा बनावटी (डयूप्लीकेट) माल पुरवितो असे आरोपींनी सांगीतले.
यावरून आरोपी
१) श्याम मोहनलाल बजाज वय ५४ वर्ष रा.सिंधी कॉलोनी गोंदिया
२) दिपक बच्चुमल लिलवानी वय २४ वर्षे रा. कुमारटोली, मालविय बार्ड, गोंदिया
३) विवेक हरिशंकर गुप्ता वय ३४ वर्ष रा.पि.ए. राईस मिल जवळ,मेंढे चौक गोंदिया
४) फरार प्रकाश खत्री रा. बिलासपुर (छ.ग.) यांचेविरूद्ध कॉपी राईट अॅक्ट चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ५१, ६३, ६५ प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ अन्वये कारवाई करण्यात आलेली असून गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
वरीष्टांचे मार्गदर्शना खाली सदरची कारवाई पो. निरीक्षक दिनेश लबडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. चे पथकाद्वारे करण्यात आली आहे.वरील करण्यात आलेल्या कारवाई वरून असे दिसून येते की, गोंदिया शहरात मोठया प्रमाणात स्वतःचे आर्थिक फायदया करीता काही व्यक्ती बनावटी(ड्युप्ली केट) साहित्य, वस्तू तयार करून विक्री करीत आहेत. बनावटी वस्तू व साहित्या च्या वापरामुळे गंभीर समस्या निर्माण होवून जीवितास अपाय सुध्दा होवू शकतो. याकरीता गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे गोंदिया शहरातील तसेच आजुबाजुचे ग्रामीण भागातील जनतेला असे आवाहन करण्यात येते की, जनतेने सतर्क राहून उत्तम दर्जाच्या वस्तूंचा वापर करावा. आरोग्यास अपायकारक बनावटी (ड्युप्लीकेट) साहित्य, वस्तू चा वापर करू नये. बनावटी साहित्य,वस्तू तयार करणारे यांची माहिती देवून गोंदिया जिल्हा पोलिस दलास सहकार्य करावे.
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
गोंदियामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई...
गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाची हातभट्टीवर पोलिसांचा छापा...
गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी चालवलेल्या मुक्या जनावरांची सुटका...
गोंदिया पोलिसांनी ट्रकवर कारवाई करत ३० जनावरांची केली सुटका...
गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई...
गोंदिया जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई...
पोलिस अधीक्षक गोंदिया यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई...
गोंदिया जिल्ह्यात हातभट्टीवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त अन्...
पोलिस अधिक्षक गोंदिया यांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई...
गोंदिया जिल्ह्यात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कारवाई...
गोंदियामध्ये रेल्वे लाईन बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरी करणारे जेरबंद...
नार्को टेस्ट म्हणजे काय असते? कशी केली जाते? घ्या सविस्तर जाणून...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.