परवेज मुशर्रफ यांच्या कुटुंबाकडून मोठी माहिती समोर...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरत आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.कराचीः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरत आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी आज (शुक्रवार) दिली. तसेच, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.
परवेझ मुशर्रफ यांच्या निधनाचे वृत्त जगभरातील विविध प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पण, हे वृत्त निराधार आहे, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. लष्करप्रमुख असताना पाकिस्तानमधील सरकार उलथवून लष्करी राजवट लागू करणारे पंतप्रधान म्हणून परवेझ मुशर्रफ यांची जगभरात ओळख आहे. सन 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानवर राज्य केले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, त्या अफवा असून मुशर्रफ यांची प्रकृती नाजूक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
Indian media is at it again by publishing a fake news about death of former President Gen #PervezMusharraf. I have confirmed from his multiple close sources that he is sick but doing okay. Refrain from joining the social media bandwagon and spreading news without verification.
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) June 10, 2022
जनरल मुशर्रफ यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांचे कुटुंबीय दुबईकडे रवाना झाले आहेत. कराई हवाई मार्गावरुन ते दुबईला पोहोचतील. यादरम्यान मुशर्रफ यांची राजकीय पार्टी ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगच्या प्रवक्त्यांनी एक प्रेस रिलिज द्वारे सांगितले की, मुशर्रफ जिवंत आहेत, त्यांच्याबद्दल चुकीच्या बातम्या चालवल्या जाऊ नये.
दरम्यान, परवेज मुशर्रफ हे 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. याशिवाय ते पाकिस्तानचे आर्मी प्रमुखही होते. भारताविरोधात झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांनाच जबाबदार धरण्यात आले होते.
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...