परमबीर सिंग यांच्या वकिलाने ठावठिकाण्याबाबत न्यायालयात सांगितले की...

परमबीर सिंग नेमके कुठे आहेत, असा सवाल न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात सुनावणी दरम्यान उपस्थित केला होता.

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग गेल्या ९ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याची याचिका त्यांच्या वकिलांनी आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

परमबीर सिंग नेमके कुठे आहेत, असा सवाल न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात सुनावणी दरम्यान उपस्थित केला होता. त्याला सिंग यांच्या वकिलांनी आज उत्तर देताना म्हटले आहे की, 'परमबीर सिंग भारतातच आहेत. ते देश सोडून गेलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा कोर्टात हजर होतील.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. परमबीर यांनी तपासाला सहकार्य करावे, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या वेतनाला 'ब्रेक'

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याबद्दल केला मोठा खुलासा...

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाकडून दणका...

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप

परमबीर सिंग यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीसह 22 गुन्हे दाखल

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Former Mumbai Police Commissioner Singh tells Supreme Court
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे