धक्कादायक! पुण्यात महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

श्रद्धा पुणे पोलिस विशेष शाखेतील बंदोबस्त विभागात कार्यरत होत्या. त्यांचे पती नेव्हीमध्ये कामाला असून त्यांना चार वर्षांची मुलगी आहे.

पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणार्‍या महिला पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रद्धा जायभाये (वय 28, रा. कावेरीनगर पोलिस लाईन, वाकड, मुळ रा. शेगाव) असे महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

पुणे पोलिसांचे भन्नाट ट्विट व्हायरल; कोणते ट्विट पाहा...

श्रद्धा पुणे पोलिस विशेष शाखेतील बंदोबस्त विभागात कार्यरत होत्या. त्यांचे पती नेव्हीमध्ये कामाला असून त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, मुलीचा सांभाळ करण्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याच रागातून श्रद्धा यांनी गळफास घेउन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाकड पोलिस तपास करीत आहेत.

पुणे शहर पोलिस दलातील 575 पोलिसांना पदोन्नती!

श्रध्दा यांचा मोबाईल लागत नसल्याने त्यांच्या एका मैत्रीणीने वाडक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वाकड पोलिस पोलिस लाईन येथे पोहचले असता श्रद्धा जायभाये यांचा दरवाजा बंद दिसला. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर श्रध्दाने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. पोलिस उपायुक्त भोईटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगळीकर यांच्यासह इतर पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: female police commits suicide in Wakad Pimpari Chinchwad
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे