सत्तापालट होणार या भीतीने बदली पात्र प्रशासकीय आधिकारी चिंतेत...

महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे यांनी सरकारविरोधात बंड केल्यामुळे राज्यातील बदली पात्र प्रशासकीय अधिकारी चिंतेत आहेत.

पुणेः महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे यांनी सरकारविरोधात बंड केल्यामुळे राज्यातील बदली पात्र प्रशासकीय अधिकारी चिंतेत आहेत. काही प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्या असून, या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. खासकरून पुणे जिल्ह्यात व परिसरात आवडती पोस्टिंग मिळविण्यासाठी पन्नास लाखांपासून ते तीन कोटी रुपयांपर्यंत बोली लागल्याची चर्चा प्रशासकीय वतुर्ळात आहे.

विविध अधिकार्‍यांनी मंत्रालयापासून ते मंत्र्यांच्या जवळच्या हस्तकापर्यंत मोठ्या रकमा 'अ‍ॅडव्हान्स' दिल्या आहेत. आता सरकार अस्थिर झाल्याने आपण दिलेले पैसे बुडणार, या भीतीने काही प्रशासकीय अधिकारी मोठ्या 'टेन्शन'मध्ये आले आहेत. पुणे जिल्हा आणि परिसरात महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क या विभागात पोस्टिंग मिळविण्यासाठी राज्यभरातील प्रशासकीय अधिकारी कायम प्रयत्नशील असतात. कितीही पैसे मोजावे लागले, तरी आपल्याला या परिसरात चांगली खुर्ची मिळावी म्हणून काही मोजके अधिकारी कोटीच्या घरात रकमा देतात.

शिवसेनेच्या पाच बंडखोर आमदारांना सूरतमध्ये मारहाण?

सन 2022-23 च्या वर्षात 30 मेपर्यंत बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु, 27 मे रोजी महाविकास आघाडी सरकारने शासन निर्णय काढत 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत, असा निर्णय घेतला. त्यामुळे मागील महिन्यात होणार्‍या बदल्या अचानक रखडल्या, 20 जूनला विधानपरिषद मतमोजणी झाल्यानंतर राज्यात सत्तांतराचा घोळ सुरू झाला आहे. त्यातच तुमचे पैसे बुडणार नाहीत. बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळ बैठकीत हा शासन निर्णय रद्द होऊन बुधवारी दुपारीच राज्यातील सर्व बदल्या होतील, असा सांगावा मंत्रालयातून काही प्रशासकीय अधिकार्‍यांना देण्यात आला होता.

पुणे पोलिसांकडून पालखी सोहळयाचे प्रत्येक अपडेट 'एका क्लीकवर'

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या शासन निर्णयावर काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आपले पैसे बुडणार, या भीतीने अधिकार्‍यांच्या पोटात अक्षरशः गोळा आला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यास ज्या अधिकार्‍यांनी आता पैसे मोजले आहेत, त्यांचे पैसे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर जे अधिकारी भाजप नेत्यांच्याही संपर्कात असतात, त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: fearing the fall of thackeray government and officer tension
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे