महिला उमेदवाराने बलात्काराचा Video केला पोस्ट अन्...

इटलीमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे.

रोम : इटलीमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारादरम्यान आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मात्र पंतप्रधानपदाच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक असलेल्या जॉर्जिया मेलोनी यांनी या निवडणुकीत विजयी होण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ बलात्काराचा आहे. 'न्यायासाठी मला मतदान करावे,' असे आवाहन जॉर्जिया मेलोनी यांनी या माध्यमातून नागरिकांना केले आहे. या कृतीमुळे मेलोनी यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

इटलीमध्ये सध्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. अशातच पंतप्रधानपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवार जॉर्जिया मेलोनी यांनी मतांसाठी बलात्काराशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या नागरिकांकडे मतं मागत आहे. मेलोनी यांच्या या कृतीवर विरोधी पक्षाने संताप व्यक्त केला असून, जोरदार टीका केली आहे.

अल-जवाहिरीला सवय पडली महागात; कसे केले ठार पाहा...

इटलीच्या उत्तरेकडील पियासेंजा या शहरातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, '55 वर्षाची एक युक्रेनियन महिला इटलीत निर्वासित म्हणून राहत आहे. तिच्यासोबत बलात्काराची घटना घडल्याचं समोर आले आहे. एका कृष्णवर्णीय व्यक्तीवर बलात्काराचा आरोप आहे.' या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मेलोनी यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी त्याचा राजकीय हेतूने वापर करत, तो ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

मेलोनी हा व्हिडिओ ब्लर न करताच ट्विटरवर पोस्ट केला. 'भरदिवसा महिलेवर बलात्कार होतोय. हे कसे सहन करायचे. मी पंतप्रधान झाले तर कायदा अधिक कडक केला जाईल,' असे त्यांनी म्हटले आहे. मेलोनी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताच, या कृत्यामुळे त्यांचे विरोधक संतापले. 'निवडणूक जिंकण्यासाठी त्या अशा घृणास्पद डावपेचांचा अवलंब करत आहेत. या घृणास्पद कृत्यासाठी इटलीची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,' असे विरोधी पक्षाने म्हटले आहे. या व्हिडिओविषयी माहिती मिळताच ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ काढून टाकला आहे.

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: Far right Italian leader criticized for posting rape video
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे