माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर गंभीर आरोप

मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन मध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलिस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे याच्यामार्फत पैसे वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या लेटरबॉम्बनंतर राज्याचे पोलिस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवाय, अनिल देशमुख यांनाही गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नवा आरोप

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारनं परमबीर सिंह प्रकरणी आता मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलिस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

परमबीर सिंग यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीसह 22 गुन्हे दाखल

दरम्यान, परबीर सिंह सुद्धा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी लवकर परमबीर सिंग यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे. परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना मलबार हिल परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचे भाडे दिले नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अनिल देशमुख यांचा दिवाणजी 'इडी'च्या ताब्यात; अडचणीत वाढ...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: extortion case registered against ips officer parambir singh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे