चाकण परिसरात ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट...

चाकण MIDC परिसरातील आंबेठान गावाजवळील भांबोली फाट्यावर असलेल्या हिताची बँकेच्या ATM सेंटरमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पुणे: चाकण एमआयडीसी परिसरात असलेल्या एका ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट झाला आहे. एटीएम सेंटरमध्ये झालेल्या या स्फोटामुले परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

राज कुंद्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा...

चाकण MIDC परिसरातील आंबेठान गावाजवळील भांबोली फाट्यावर असलेल्या हिताची बँकेच्या ATM सेंटरमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, हा स्फोट नेमका कसला आहे आणि कशामुळे झाला आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. स्थानिकांनी सांगितले की, पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, ATM सेंटरचे दरवाजे दूर फेकले गेले आणि ATM मशीन ही जळाली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मंगलदास बांदल यांच्या कुटंबाच्या अडचणीत झाली पुन्हा वाढ...

दरम्यान, हा स्फोट चोरीच्या उद्देशाने केला गेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: explosion in atm center in chakan midc area pune district bd
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे