पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी घोषणा...

देशात सर्वांना मोफत लस मिळणार

21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत असताना आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली. 'देशात यापुढे सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे, राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे. 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आज (सोमवार) केली.

रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा: मुख्यमंत्री

'१ मेपासून 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम राज्यांवर २५ टक्के सोपवले होते. त्यांनी आपल्या परीने काम केले. पण, हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आहे. संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे. ते यांच्या लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली. त्यामुळे राज्य सरकारांना कळून चुकले की पहिली व्यवस्था ही चांगली होती. एक चांगली गोष्ट राहिली, राज्य सरकार हे फेरविचार करून आमच्याकडे आले आणि देशातील नागरिकांना त्रास होऊ नये. त्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना मोफत लस मिळणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली.

अनलॉकबाबत नियमावली जाहीर, कोणता जिल्हा कधी पाहा...

21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे. शिवाय, ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये लस घ्यायची असेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात. लसीची जी किंमत आहे, त्यावर 150 सर्व्हिस चार्जच खासगी हॉस्पिटल घेऊ शकतात, असेही मोदींनी स्पष्ट केले.

खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार...
कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा केली होती. हीच सुविधा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही कायम राहणार आहे. मे आणि जूनमध्ये ही योजना सुरू राहणार असून पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.

मोदी पुढे म्हणाले, '80 कोटीहून अधिक नागरिकांना आतापर्यंत मोफत धान्य देण्यात आले आहे. ही सुविधा यापुढेही नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आता PM गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानातून मोफत धान्य घेऊ शकतात. देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये हेच यामागील उद्दिष्ट आहे.'

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

गेल्या १०० वर्षातली ही मोठी महामारी
'देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोरोनाविरोधातल्या लढाईत आपण अनेकांना गमावले आहे. कोरोनामुळे ज्या लोकांचा मृ्त्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना कायम आहे. गेल्या १०० वर्षातली ही मोठी महामारी आहे. कोविड हॉस्पिटल, औषध सेवा पुरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. नौदल, वायू सेना सर्वांनी जीवाची बाजी लावून काम केले.'

कोरोनाच्या काळात मोफत धान्य योजनेमध्ये झालाय मोठा घोटाळा?

'जगात जिथे कुठे उपलब्ध होईल, ते सर्व भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या लढाईत लस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लशीची संपूर्ण देशातून मागणी आहे. लस बनवणारे देश मोजकेच आहे. भारतात जर लस बनवण्याची कंपनी जर नसती तर आपल्या या विशाल देशात काय अवस्था झाली असती. आधी भारताला विदेशातून लस मिळवण्यासाठी खूप कठीण काम होते. बाहेरच्या देशात लस तयार झाल्यानंतर आपल्याला लस मिळत होती. पोलिओच्या लशीचे तसेच झाले' असंही मोदी म्हणाले.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना घेता येणार लस; कशी ती पाहा...

वर्षाभरात भारताने एक नव्हे दोन लशी तयार केल्या. आम्ही कोणत्याही देशांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे. 23 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. आपल्या शास्त्रांनी लस निर्माण करण्याची क्षमता होती, याबद्दल पूर्ण विश्वास होता. कोरोना काळात कोरोना लस टास्क फोर्सची निर्मिती केली. लस घेण्यासाठी मदत केली. सात वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहे. आणखी 3 कंपन्या काम करत आहे, असेही मोदींनी सांगितले.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: everyone will get free vaccine prime minister modis big anno
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे