नक्षलवाद्यांशी चकमक : एक थरारक अनुभव

आता सकाळ होत आलेली.राञभर सगळे चालत चालत सकाळी एका नाल्याजवळ पोहोचले.या नाल्यापलिकडे काही अंतरावर छोटी पहाडी होती.यावेळी आम्ही पथकातील जवानांचे दोन गट केले अन पहाडीजवळ शोध घेण्याचे ठरविले.काही अंतरावर आम्ही गेल्यानंतर नक्षलवादी तळ दिसला.अन आम्ही सर्वांना सावध होत एकमेकांना सावध सुचना केल्या.यावेळी पोलीस पथक जवळ आल्याचे त्यांच्याही गटाला शंका आली अन त्यांच्याकडुन आमच्या दिशेने गोळीबार सुरु झाला.यावेळी आमच्या दोन्हीही तुकडयांनी त्यांना घेरले होते.त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता.समोरुन गोळीबार सुरु झाल्यानंतर आमच्या पथकातील जवानांनी नक्षलावाद्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु केला.

गडचिरोली नाव ऐकलं तरी अनेकांना क्षणात डोळ्यासमोर उभं राहते ते जंगल अन् आठवतो तो नक्षलवाद. अशा या अतिदुर्गम भागात पोलिस खात्यात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम पोस्टिंग झाले. त्या वेळी ना कसला अनुभव ना कसलीच माहिती. परंतु पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गडचिरोलीतील सी-६० या विशेष अभियान पथकात पार्टी इन्चार्ज म्हणून नेमणूक झाली होती. या विशेष पथकात नियुक्ती झाल्यानंतर डोळ्यासमोर ध्येय होते ते नक्षलवादविरोधी अभियान राबविणे. नक्षलवादाचा बिमोड करणे याच हेतूने गडचिरोलीमध्ये या पथकाचे काम सुरू असते. गडचिरोली जिल्ह्यात काम करत असताना अनेक प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात. त्यातीलच हा एक थरारक अनुभव. सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्याच शब्दांत...

सी-६० स्पेशल फोर्स मधील मोतीराम मडावी व प्रभुदास दुग्गा पथकाचा इंन्चार्ज असताना एके राञी बंदोबस्तावर असताना स्थानिक बातमीदाराकडुन कसनसुर जंगल परिसरात नक्षलवादयांनी कॅंम्प केला असल्याची माहिती मिळाली होती.ती राञीची वेळ असावी साधारण दहा साडेदहाची.त्याचवेळीस आमच्या पथकातील सर्व जवान तत्काळ सज्ज झाले.यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक एम.राजकुमार हेही या पथकासोबत होते.नक्षलवाद्यांची माहिती मिळताच सर्वांनी राञीच अॉपरेशन राबवायचे ठरवले.त्यानुसार अभियानाची रुपरेषा ठरवण्यात आली.अभियानाची तयारी म्हणुन सर्व हत्यारे,बंदुका,दारुगोळा यांची तयारी केली.सर्व सोबत घेउनच राञीच्या सुमारास कामाला लागले.सी.६० अॉफिस गडचिरोली येथुन माइल्स प्रोटेक्टिव्ह वेहिकल (एम.व्ही.पी) हे वाहन घेउन आम्ही कसनसुर जवळील झुरी गावापर्यंत पोहोचलो.यावेळी राञीचे साधारण १२ वाजले असतील.सर्वञ घनदाट जंगल.रातकिड्यांचा किर्रर आवाज.अधुनमधुन जंगली जनावरांचा आवाज हे सर्व भीतीदायक वातावरण.अशा वातावरणात आम्ही तिथं पोहोचलेलो.या गावापासुन साधारण दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर नक्षल्यांचा तळ असल्याची माहिती होती,माञ नक्की ठिकाण माहिती नव्हते. अशा वेळी सर्वांनी पायी चालण्याचा निर्णय घेतला अन पायी अंतर कापत निघालो.राञी निघालेलो न थांबता सर्वजण परिस्थितीचा अंदाज घेत सावध पायी चालत होते.एव्हाना पहाटेचे पाच वाजत आलेले.एवढ्यात जंगलात चालत असताना पथकातील एका जवानाला एक व्यक्ती पाउलवाटेने सायकलवरुन जाताना दिसला.यावेळी त्या व्यक्तीला आवाज दिला असता त्या व्यक्तीने चपळाईने संशय आल्याने सायकल तिथेच सोडुन धुम ठोकली अन तो व्यक्ती जंगलात पळुन गेला.यावेळी पथकातील जवानांनी सायकलच्या चाकाच्या ठशांचा मागोवा घेत शोध घेणे सुरु केले अन त्या दिशेने आगेकुच केली.सर्वांनाच कॅम्प जवळ आल्याची खाञी पटली होती.

आता सकाळ होत आलेली.राञभर सगळे चालत चालत सकाळी एका नाल्याजवळ पोहोचले.या नाल्यापलिकडे काही अंतरावर छोटी पहाडी होती.यावेळी आम्ही पथकातील जवानांचे दोन गट केले अन पहाडीजवळ शोध घेण्याचे ठरविले.काही अंतरावर आम्ही गेल्यानंतर नक्षलवादी तळ दिसला.अन आम्ही सर्वांना सावध होत एकमेकांना सावध सुचना केल्या.यावेळी पोलीस पथक जवळ  आल्याचे त्यांच्याही गटाला शंका आली अन त्यांच्याकडुन आमच्या दिशेने गोळीबार सुरु झाला.यावेळी आमच्या दोन्हीही तुकडयांनी त्यांना घेरले होते.त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता.समोरुन गोळीबार सुरु झाल्यानंतर आमच्या पथकातील जवानांनी नक्षलावाद्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु केला.काही मिनिटे चाललेल्या या गोळीबारात काही नलक्षवाद्यांना पोलीसांच्या गोळया लागल्या.तर यावेळीस अचानक एका  नक्षलवाद्याकडुन आलेली गोळी काही अंतरावरुन गेली.स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळया झाडल्या.त्यातील दोघांच्याही त्या जिव्हारी लागल्या अन ते निपचित पडले.या गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी सैरावैरा पळु लागले.पथकातील जवानांनी हा तळ उद्धवस्त केला.दोन निपचित पडलेल्या नक्षलवाद्यांवर जवळजावुन गोळीबार करत मेल्याची खाञी केली.यावेळीस पोलीस जवानांनी मृतदेह ताब्यात घेतले.अन मोहिम फत्ते  केली.संपुर्ण राञभर केलेल्या सर्च अॉपरेशनला अखेर यश आले होते.

पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळख असलेले सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांचे मुळ गाव कोल्हापुर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड हे गाव.जन्म १० जुन १९८७ चा.प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत,पाचवी ते आठवी पर्यंतचे न्यु इंग्लिश स्कुल,शेडशाळा तर ९ वी ते १०वी साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड,उच्च शिक्षण दत्त महाविद्यालय,कुरुंदवाड येथे झाले.महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणुन २०११ ते २०१४ या काळात गडचिरोली येथे काम केले.त्या नंतर ठाणे शहर येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणुन २०१४ ते २०१६ मध्ये काम पाहिले.पुन्हा गडचिरोली येथे पोस्टिंग मागवुन २०१६-२०१८ मध्ये काम केले व त्यानंतर आजतागायत ते रांजणगाव एमआयडीसी येथे चांगल्या कामाचा ठसा उमटवित आहे.

आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत सन २०१६ मध्ये विशेष सेवा पदक,त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने दिले जाणारे आंतरिक सुरक्षा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.सन २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले असुन पोलीस महासंचालक पदकानेही त्यांच्या विशेष कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि,गडचिरोलीत कार्यरत असताना भीती कधीच वाटली नाही.पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांना आम्ही आदर्श मानत असुन त्यांनी पोलीस जवानांचे सातत्याने मनोबल वाढविण्याचे कार्य केले.त्यामुळेच आम्ही अनेक धाडसी कारवाया करु शकलो असुन पथकातील सहका-यांनी दिलेले योगदान मोठे आहे.

Title: Encounter In Gadachiroli Great experience by prafull Kadam