अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

अनिल देशमुख यांना अनेकदा नोटीस बजावूनही ते ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत.

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. शिवाय, त्यांचा ठावठिकाणाही लागत नाही. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी...

अनिल देशमुख यांना अनेकदा नोटीस बजावूनही ते ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यामुळे आता ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी त्यांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी काय मिळाले होते पाहा....

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी देशमुख यांचे वकील आनंद डागा व सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. सीबीआयने या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. तिवारी हे वकील डागा यांच्या संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण हाती लागल्याने व पुरावे मिळाल्यावर या दोघांनाही अटक केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात संजीव पलांडे उच्च न्यायालयात...

दरम्यान, अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय, ईडीकडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे सहाय्य करू. राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी अटक होऊ नये, यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे.

अनिल देशमुख चौकशी अहवाल लीक प्रकरणी मोठी कारवाई...

अनिल देशमुख यांच्या जावयाच्या वृत्तानी उडाली एकच खळबळ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स...

अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयची मोठी कारवाई...

मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा झटका...

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांचा दिवाणजी 'इडी'च्या ताब्यात; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा मोठा दणका...

'ईडी'च्या तिसऱया समन्सनंतर अनिल देशमुख यांचे उत्तर...

अनिल देशमुख यांच्या दोन साथीदारांना १ जुलैपर्यंत ईडी कोठडी

'ईडी'ची चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठीः शरद पवार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

अनिल देशमुख यांच्या घरी 'ईडी'चा छापा; वळसे पाटील म्हणाले...

अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर 'ईडी'ची धाड

अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आणि...

अनिल देशमुख यांचा सीबीआय चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

'सत्यमेव जयते' म्हणत अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: ED need help from CBI to find Anil Deshmukh for 100 crore
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे