खुनासह जबरी चोरी मधील आरोपी दोन तासात जेरबंद...

सदरची घटना पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत व अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांना समजताच त्यांनी जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यात सदर घटनेबाबत तात्काळ माहिती देवून घटनास्थळी धाव घेतली.

धुळेः स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने खुनासह जबरी चोरी मधील आरोपींना दोन तासात जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये चिमुकल्यांचे मृतदेह पाहून संपूर्ण गाव हळहळले...

शिंदखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दराने गावाचा रहिवासी प्रेमसिंग राजेंद्र गिरासे (वय 21) हे त्याचे मित्रांसह पाटन येथे जावून बजाज शोरुमध्ये रुपये 24,900 डाउनपेमेंट भरुन नविन बजाज प्लॅटीना मोटारसायकल विकत घेवून एकटे गावी जात होते. सोनगीर-दोंडाईचा रोडवर चिमठाणा MSEB सब स्टेशन समोर दुपारी 03/15 वा.चे सुमारास अनोळखींनी मोटारसायकलवर येवून त्यांची मोटारसायकल अडवली. त्याचेवर धारदार हत्याराने वार करुन त्यांना जिवे ठार मारुन त्यांच्या ताब्यातील नवीन बजाज प्लॅटीना मोटारसायकल व मोबाईल जबरीने हिसकावून पळुन नेल्याची घटना घडली होती.

हृदयद्रावक! नागाने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश केला अन्...

सदरची घटना पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत व अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांना समजताच त्यांनी जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यात सदर घटनेबाबत तात्काळ माहिती देवून घटनास्थळी धाव घेतली. जिल्ह्यातील सर्व पो स्टे चे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून तपासाबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या. वेगवेगळे तपास पथके तयार करुन ते आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचे निधन...

तपासादरम्यान प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा खलाने गावाचा रहिवाशी श्याम युवराज मोरे व त्याचे काही साथीदारांनी केल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार खलाने गावी जावून श्याम युवराज मोरे याचा शोध घेतला असता तो त्याचे पत्नीसह माळीच या गावी सासरवाडीला गेल्याची माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच पथकाने वेळ न दवडता तात्काळ माळीच गावी जावून खात्री केली असता श्याम युवराज मोरे व राकेश रोहीदास मोरे असे दोघे ड्रिम युगा मोटारसायकल क्र.एम एच 18 ए एल 3691 वर बसून शिरपूरचे दिशेने गेले आहेत, अशी माहिती समजली. पथकाने तात्काळ मुंबई-आग्रा हायवेने शिरपूरचे दिशेने रवाना होवून ड्रिम युगा मोटारसायकल क्र.एम एच 18 ए एल 3691 चा शोध सुरू केला. 

आता जेवण मिळू शकत नाही एवढेच म्हटले तर...

सदर मोटारसायकलवर दोन व्यक्ती बसून शिरपूरचे दिशेने वेगाने जात असल्याचे दिसल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना गव्हाने शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे पुढे बाबा का ढाबा समोर रोडवर अडवून ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव-गाव व गुन्ह्याबाबत विचारले असता त्यांनी त्यांची नावे श्याम युवराज मोरे व राकेश रोहीदास मोरे (दोन्ही रा. खलाने) असे सांगितले. त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचा साथीदार नामे संदिप फुलचंद पवार (रा. खलाने) याच्यासह केल्याचे कबूल केले. संदिप फुलचंद पवार यास खलाने गावाचे शिवारातून ताब्यात घेण्यात आले. आरोपी 01) श्याम युवराज मोरे (वय 28), 02) राकेश रोहीदास मोरे (वय 32), 03) संदिप फुलचंद पवार (वय 21, तिघेही रा.खलाने ता.शिंदखेडा जि.धुळे) यांना ड्रिम युगा मोटारसायकल सह पुढील तपासकामी शिंदखेडा पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्यांची 11.09.2021 रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिंदखेडा पोलिस करीत आहेत. आरोपी क्र.01 व 02 यांचे विरुद्ध सुरत (गुजरात राज्य) जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला गंभिर गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेबाबत शिंदखेडा पोलिस स्टेशन येथे गु.र.नं 135/2021 भा.दं.वि.स.कलम 302,394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

धक्कादायक! पुण्यातील सामूहिक बलात्काराबाबत नवी माहिती समोर...

सदरची कारवाई चिन्मय पंडीत, पोलिस अधिक्षक, धुळे, प्रशांत बच्छाव, अप्पर पोलिस अधिक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्था,गु,शा,धुळे चे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, पोउपनि योगेश राऊत, पोउपनि बाळासाहेब सुर्यवंशी व त्यांचे पथकाने केली आहे.

बापरे! पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर नातेवाईकांना बसला धक्का...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: dhule crime news lcb team arrested for murder case in two hr
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे