धमकी! 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय...'

आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगून 20 लाखांची खंडणी मागितली. गेल्या दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरू होता.

पुणे: पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून धमकी (Fake threat call) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

धक्कादायक! दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानला फरार...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करत आरोपींनी 20 लाखांची खंडणी मागितली आहे. गेल्या दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल दाखल केला आहे. 

युवक कमरेला वारंवार हात लावत होता; पोलिसांना संशय आला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गूगल प्ले स्टोअरवरून 'फेक कॉल अ‍ॅप' नावाचं अ‍ॅप डाऊनलोड केले होते. संबंधित अ‍ॅपचा वापर करत आरोपींनी अजित पवारांचा मोबाइल क्रमांक वापरला होता. तसेच आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगून 20 लाखांची खंडणी मागितली. गेल्या दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत हा प्रकार सुरू होता. आरोपींनी संबंधित व्यावसायिकाकडे वीस लाखाची खंडणी मागून त्यांच्याकडून आतापर्यंत दोन लाख रुपये उकळले आहेत. आरोपींनी फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाला फोन करून हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरमले आणि इतर नऊ जणांसोबत सुरू असलेला जमिनीचा वाद मिटवून टाका. अन्यथा गावात पाऊल ठेऊ देणार नाही. तसेच परिसरात तुमचा कोणताही प्रकल्प चालू देणार नाही, अशी धमकी बांधकाम व्यावसायिकाला दिली होती.

थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

या प्रकरणी अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: demand 20 lakh ransom from pune builder name of ajit pawar
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे